शाळा सुरु करतांना ठाकरे सरकार करणार विशेष ‘हेल्थ क्लिनिक’!
School Dainik Gomantak

शाळा सुरु करतांना ठाकरे सरकार करणार विशेष ‘हेल्थ क्लिनिक’!

तपासणीमध्ये ताप, सर्दी किंवा इतर आजार आढळून आल्यास संबंधित विद्यार्थ्यांची लगेच तपासणी करून त्याच्या उपस्थितीबाबत निर्णय घ्यावा,

महाराष्ट्र: कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने 4 ऑक्टोबरपासून 5 वी ते 12 वी माध्यमाच्या शाळा सुरू होणार आहेत. शाळा सुरू करण्याचे आदेश जारी करताना ठाकरे सरकारने विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेसाठी शिक्षक, पालक, शालेय प्रशासन यांना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. यामध्ये शाळा सुरू करत असताना प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांची (Student)आरोग्य तपासणीसाठी 'हेल्थ क्लिनिक' ('Health Clinic')सुरू करणेबाबत सूचना दिल्या आहेत. यासाठी इच्छुक डॉक्टर व पालकांचीही यामध्ये मदत घेण्याचे स्पष्ठ केले आहे.

ठाकरे सरकारच्या सूचनेनुसार 4 ऑक्टोबरपासून राज्यात पाचती ते बारावीपर्यंतच्या सर्वच शाळा सुरू करणार आहेत. सरकारने जाहीर केलेल्या अध्यादेशामध्ये शाळा सुरू करत असताना सुरू झाल्यानंतर त्या संदर्भात काळजी घेणे बाबत विविध उपाययोजनावर सूचनांचे पालन करण्याचे सूचित केले आहे. याबाबत अतिरिक्‍त सूचना 24 सप्टेंबर रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने सहसचिव राजेंद्र पवार यांच्या स्वाक्षरीने जारी केल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने पहिल्याच सूचनांत प्रत्येक शाळेत स्वतः किंवा CSR निधीच्या मदतीने विद्यार्थ्यांसाठी 'हेल्थ क्लिनिक' उभारण्याचे सांगितले आहे.

School
शाळा सुरु होत असेल तर कोर्ट का बंद ? ;अल्पवयीन मुलीचे सरन्यायाधीशांना पत्र

शाळेत दररोज क्लिनिकच्या (Clinic)माध्यमातून विद्यार्थ्यांचे टेम्परेचर तपासण्यात यावे. सर्व शाळा स्थानिक सरकारी आरोग्य केंद्रांशी संलग्न कराव्यात. या स्थानिक केंद्रांतील डॉक्टर व परिचारिकांची हेल्थ क्लिनिकसाठी मदत घ्यावी. असेही त्यामध्ये नमूद केले आहे. या तपासणीमध्ये ताप, सर्दी किंवा इतर आजार आढळून आल्यास संबंधित विद्यार्थ्यांची लगेच तपासणी करून त्याच्या उपस्थितीबाबत निर्णय घ्यावा, असेही सांगण्यात आले आहे. मात्र हे क्लिनिक सुरू करण्याचे पालन प्रत्येक शाळेकडून केले जाईल का?

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com