नावात काय आहे? एकाच वॉर्डात दोन महिला उमेदवारांच्या पतींना नावाचाच झालाय ताप

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 8 जानेवारी 2021

नावात काय आहे असं आपण सहज बोलून जातो पण याच नावाचा निवडणुकांमध्ये विरोधी उमेदवार मते खाण्यासाठी वापर करतांना दिसून येते.

ठाणे: नावात काय आहे असं आपण सहज बोलून जातो पण याच नावाचा निवडणुकांमध्ये विरोधी उमेदवार मते खाण्यासाठी वापर करतांना दिसून येते. अशाच एका ग्रामपंचायतीच्या उमेदवारांची चर्चा सध्या राज्यभर सुरू आहे. भिवंडी तालुक्यात असलेल्या पिंपळास येथिल एक फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ग्रामपंचायत निवडणुकमध्ये उभ्या असलेल्या महिला उमेदवारांच्या प्रचारासाठीचा हा फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यात दोन्ही महिला उमेदवारांच्या पतींना मोठा त्रास झालेला आहे..

पिंपळास ग्रामपंचायतीतल्या वॉर्ड क्रमांक 4 ड मधून कोमल कल्पेश म्हस्के आणि सुजाता कल्पेश म्हस्के या दोन महिलांनी उमेदवांरी दाखल केली आहे. सुजाता आणि कोमल यांच्या पतींची नावांमध्ये असलेल्या साम्यतेमुळए त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. दोघींचे पती नातेवाईक असून सुजाता यांच्या पतीचे पूर्ण नाव कल्पेश बारक्या म्हस्के असे आहे. तर कोमल यांच्या पतीचे नाव कल्पेश सुरेश म्हस्के असे आहे.

कोमल आणि सुजाता या दोघीही शिवसेना पुरस्कृत अग्निमाता ग्रामविकास पॅनेलमधून एकाच वॉर्डमधून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या नावात असलेल्या साम्यामुळे मतदारही गोंधळात पडले आहेत. निवडणूक निकालात या नावाच्या गोंधळाचा परिणाम दिसून येण्याची शक्यता जाणवत आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर या प्रचाराचे पोस्टर प्रचंड व्हायरल झाले आहे. त्यात एकाच वॉर्डमध्ये एकाच नवऱ्याने दोन बायकांना उभा केलं असा दावाही केला जात आहे. तसंच आता नवरा प्रचार कोणाचा करणार आणि मत कुणाला देणार असंही म्हटलं जात आहे. असा गमतीचा भाग म्हणूनही या पोस्टरकडे बघितलं जात आहे. सध्या या सोशल मिडियीवर व्हायरल झालेल्या पोस्टचा त्रास दोन्ही महिला उमेदवारांसह त्यांच्या पतींना आणि कुटुंबियांनाही होत आहे.

आणखी वाचा:

कोकण पर्यटन अजूनही कोरोनाच्या छत्रछायेखाली -

संबंधित बातम्या