हापुस प्रेमींच्या पदरी या वेळी निराशा!

पाऊस झाल्यानं हापूसचं आगमन देखील लांबण्याची दाट शक्यता आहे.
हापुस प्रेमींच्या पदरी या वेळी निराशा!
Hapus MangoDainik Gomantak

आंबा म्हटल की आपल्या तोंडाला पाणी सुटते, मार्च महिना सुरू झाल्यानंतर हापूसच्या आगमनाची घाई प्रत्येक हापूस प्रेमीला असते. पण, यंदा मात्र पावसामुळे हापूस प्रेमींची निराशा होऊ शकतात.

हापूस! कोकणचा राजा (King of Konkan). अनेकांचं आवडीचं फळ म्हणजे हापूस आंबा (Hapus Mango) . कारण राज्याच्या इतर भागात पडत असलेला पाऊस अद्याप देखील कोकणातील बहुतांश भागात कोसळत आहे. त्याचा परिणाम हापूसच्या मोहोर प्रक्रियेवर होऊन हापूस बाजारात दाखल होण्यावर होऊ शकते. कारण, नोव्हेंबर महिन्यात पडणारी कडाक्याची थंडी हापूससाठी पोषक मानली जाते. पण, आता पाऊस कोसळत असल्यानं हापुसा राजाचे सर्व गणित बदले आहे. त्यामुळे कोकणातील छोट्या - मोठ्या हापूस बागायतदारांना याचा फटका बसणार आहे. हापूसच्या मोहोर प्रक्रियेदरम्यान पाऊस झाल्यानं हापूसचं आगमन देखील लांबण्याची दाट शक्यता आहे.

Hapus Mango
मासेमारी दरम्यान जाळ्यात अडकला डॉल्फिन!

'पावसानं आंबा बागायतदारांची सारी गणितं बिघडवली आहेत. काही जणांनी पहिली आणि दुसरी फवारणी झाडांवर केली असून त्यातून काही लाखांचा देखील खर्च केला आहे. पण, पावसानं केलेल्या साऱ्या फवारण्या मातीमोल केल्या. आता किमान कुठं तरी दिसणारा मोहोर जाणार. झाडांना रोगांचा सामना करावा लागणार. त्यामुळे फवारणीसाठीचा हा खर्च आणखी देखील वाढू शकतो. शिवाय, थंडी देखील न पडल्यास हापूसच्या मोहोर प्रक्रिया लांबल्यास त्याचा परिणाम हा हापूस बाजारात दाखल होण्यावर होणार आहे'

2009 साली कोकण किनारपट्टीवर फयान चक्रीवादळ आलं. त्यानंतर वातावरणात सातत्यानं बदल जाणवू लागले. मागील दोन ते तीन वर्षाचा विचार केल्यास निसर्ग आमच्यावर आणखीच रूसला आहे कि काय? असा प्रश्न पडतो. 'फयान'मुळे झाडं मुळापासून हलली. अगदी हल्लीच आलेल्या 'निसर्ग चक्रीवादळा'नं देखील मोठा फटका दिला. हे सारं कमी म्हणून कि काय, 'तोक्ते चक्रीवादळ' आलं. त्यानंतर यंदा मे महिन्याच्या मध्यात आलेल्या पावसामुळे आंब्याचं मोठं नुकसान झालं. मे महिन्यात सुरू झालेला पाऊस अद्याप अर्थात नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत सुरू आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात किमान 66 हजार हेक्टरवर हापूसची लागवड आहे. पण, निसर्गाच्या लहरीपणामुळे या संपूर्ण लागवडीवर मात्र नक्कीच परिणाम होतो. वाढता खर्च, त्यानंतर मिळणारं उत्पन्न यांचा ताळमेळ देखील बसत नाही असं आंबा बागायतदार सांगतात. परिणामी निसर्गाची साथ हिच बळीराजासाठी महत्वाची आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com