मुलीला वाचवण्यासाठी आईने केले बिबट्याशी दोन हात

चंद्रपूर, दुर्गापूर येथे घडली घटना; नागरिक संतप्त
Leopard
LeopardDainik Gomantak

आईची महती सांगणारी अनेक उदाहरणे दिली जातात. मात्र आई आपल्या बाळासाठी काय करु शकते याच आणखी एक उदाहरण समोर आले आहे. चंद्रपूरमधील दुर्गापूर येथे एका तीन वर्षीय चिमुरडीवर बिबट्याने हल्ला केला आहे. मंगळवारी रात्री 9.30 वाजता ही घटना घडली. मात्र मुलीच्या आईने या बिबट्यावर काठीने प्रहार करत आपल्या मुलीचा जीव वाचविला आहे. मात्र यामुळे वन्य प्राण्यांच्या हल्ल्याचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Leopard
'किरीट का कमाल' म्हणत संजय राऊतांचा सोमय्यांवर हल्लाबोल

चंद्रपुरमध्ये गेल्या काही महिन्यात अनेकदा बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या हल्ल्यात आतापर्यंत तीघांना मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. यामध्ये लहान व मोठ्यांची समावेश आहे. मात्र वनविभागाने अजूनही त्या बिबट्याचा बंदोबस्त केला नाही.

Leopard
...आता भाजपा नेते मध्यप्रदेश सरकारला ओबीसीविरोधी म्हणतील का ?

मंगळवारी रात्री संतप्त होत लोकांनी वन विभागाच्या १० कर्मचाऱ्यांना डांबून ठेवलं. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. त्यांची 5 तासानंतर या सोडण्यात आले होते.मंगळवारी रात्री ९ वाजता आरक्षा पोप्पूलवार ही तीन वर्षीय चिमुकली खेळून झाल्यावर जेवायला बसली होती, त्याचवेळी अचानक बिबट्याने आरक्षावर हल्ला केला.

मुलीवर झालेला हल्ला बघताक्षणी आईने त्या बिबट्यावर काठीने वार करीत बिबट्याच्या तावडीतून मुलीला सोडविले. दुर्गापूर पोलिसांनी तात्काळ त्या मुलीला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वेळेवर उपचार मिळाल्याने मुलीची प्रकृती आता बरी आहे. मात्र यामुळे वन्य प्राण्यांच्या हल्ल्याचा विषय पुन्हा ऐरणीवर आला असुन नागरिकांना यावर कायमचा तोडगा हवा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com