''जनतेसाठी मुख्यमंत्री असतो''; पर्रीकरांचा फोटो शेअर करत उध्दव ठाकरेंना टोला

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 21 एप्रिल 2021

 जनतेसाठी मुख्यमंत्री असतो हे समजून घ्यायचं असतं.

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला असताना सरकार आणि नागरिकांच्या चिंतेत अधिकच भर पडत आहे. कोरोनाच्या संकटातही राजकिय पक्ष एकमेंकावर आरोप प्रत्यारोप करत आहेत. याच आरोपांच्या पाश्वभूमीवर आमदार सुरेश भोळे (Suresh Bhole) यांनी गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर(Manohar Parrikar) यांचा फोटो ट्विट करत मुख्यमंत्री कसा असावा याचा आदर्श घ्या, असं सांगत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. (There is a Chief Minister for the people Tola Uddhav Thackeray sharing a photo of Parrikar)

सध्या राज्यात कोरोनाचं संक्रमण मोठ्याप्रमाणात वाढत आहे. दुसरीकडे मात्र राजकिय पक्षांचे आरोप प्रत्यारोप सुरुच आहेत. भाजपच्या राजकिय मंडळींकडून राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार टिका केली जात आहे. यामध्ये राज्य सरकारने केलेल्या टिकेच्या पाश्वभूमीवर आमदार सुरेश भोळे यांनी आघाडी सरकारवर टिका करत म्हटले की, केंद्र सरकारने काय काम केले त्याची श्वेतपत्रिका काढावी, यामुळे सर्व काही जनतेच्या समोर येईल. सोबतच आमदार सुरेश भोळे यांनी मनोहर पर्रीकर यांचा ऑक्सिजन सुरु असतानाही काम करत असल्याचा फोटो ट्विट करत आदर्श मुख्यमंत्री कसा असावा, असं म्हणत ज्याला आदर्श घ्यायचा त्याने तो घ्यावा, असा सल्ला दिला आहे. 

देवेंद्र फडणवीस यांचा 'पुतण्या' का आला चर्चेत? जाणून घ्या काय आहे...

दरम्यान, भोळे यांनी ट्विटमध्ये म्हटले, ''डोळे भरुन येणारच, प्रकृती नाजूक असताना देखील ते काम करत असत. जनतेसाठी मुख्यमंत्री असतो हे समजून घ्यायचं असतं. घरी बसून प्रकृती संभाळणारा मुख्यमंत्री जनतेला कदापि नको असतो. आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करणारा समाजसेवी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर. ''
 

संबंधित बातम्या