'नरेंद्र मोदींना पराभूत करायचे असेल तर... ': शरद पावर

भाजपविरोधात केंद्रीय पातळीवर तिसऱ्या आघाडीच्या स्थापनेला वेग आला असून या अनुषंगाने दिल्लीमध्ये काही प्रमुख नेत्यांच्या बैठकासुद्धा पार पडल्या होत्या.
'नरेंद्र मोदींना पराभूत करायचे असेल तर... ': शरद पावर
There is no issue to decide leadership for new third front to fight election against BJP says NCP president Sharad Pawar Dainik Gomantak

भाजप सरकार (BJP) विरोधात जनतेत असंतोष आहे. लोकसभेच्या आगामी निवडणुकीत नरेंद्र मोदींना (Narendra Modi) पराभूत करायचे असेल तर मतदारांना पर्याय उपलब्ध करून देणे गरजेचे असून सोनिया (Sonia Gandhi) व ममतांच्या (Mamata Banerjee) नेतृत्वाला हरकत नाही. तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व कोणी करावे? हे आमच्यासाठी फारसे महत्त्वाचे नसल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे. (There is no issue to decide leadership for new third front to fight election against BJP says NCP president Sharad Pawar)

भाजपविरोधात केंद्रीय पातळीवर तिसऱ्या आघाडीच्या स्थापनेला वेग आला असून या अनुषंगाने दिल्लीमध्ये काही प्रमुख नेत्यांच्या बैठकासुद्धा पार पडल्या होत्या. मात्र, आघाडीचे नेतृत्व कोणी करावे? यावरून मतभेद असल्याची चर्चा आहे. याबाबत पवार यांना विचारणा केली असता त्यांनी नेतृत्वावरून कुठलाच वाद नसल्याचे सांगितले. भाजपविरोधी आघाडीचे नेतृत्व सोनिया गांधी किंवा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले तरी आम्हाला कुठलीच हरकत नाही. यासंदर्भात काँग्रेसने यापूर्वी घेतलेल्या प्रत्येक बैठकीला राष्ट्रवादीचे प्रतिनिधी उपस्थित होते. आघाडी संदर्भात संसदेच्या आगामी अधिवेशनात सर्व विरोधकांना या विषयावर सविस्तर चर्चा करण्यास पुरेसा वेळ मिळणार आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन, त्यांना केलेला चिरडण्याचा प्रयत्न, पेट्रोल, डिझेल, सिलिंडरच्या किमती, महागाई अशा सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर मोदी सरकारला घेरण्याची संधी विरोधकांना आहे.

आगामी महापालिका निवडणुका महाविकास आघाडीने एकत्रितपणे लढाव्यात अशी आमची इच्छा आहे. मात्र त्या बाबत आत्ताच सांगता येणार नाही. वेगवेगळे लढलो तरी वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. प्रत्येक पक्षाला ताकद वाढवायची असते. वेगळे लढलो तरी आघाडीवर परिणाम होणार नाही.असा विश्वास देखील त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे .

There is no issue to decide  leadership for new third front to fight election against BJP says NCP president Sharad Pawar
चीन घुसखोरी करतोय तरी मोदी सरकार शांतच

त्याचबरोबर त्रिपुरा हिंसाचाराचे पडसाद महाराष्ट्रात उमटले हे योग्य नाही. पण राज्यात जे झाले, ते धर्मांध शक्तीमुळे झाले. देशात धर्मांध शक्तीचे आव्हान आहे, असे स्पष्ट करताना महाविकास आघाडी काळात राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाल्याचा भाजप राज्य कार्यकारिणीत ठराव केला हा हास्यस्पद ठराव असल्याची टीका देखील शरद पवार यांनी यावेळी केली आहे .राज्याला पार्टटाइम मुख्यमंत्री नको, असे विधान करत भाजपने उद्धव ठाकरे यांना लक्ष केले आहे.भाजपच्या या आरोपाला प्रतिउत्तर देताना . "त्या वक्तव्यात दम नाही, मुख्यमंत्री हा मुख्यमंत्री असतो. त्यांना जबाबदारी दिली आहे, जनतेने स्वागत केलं आहे. ठाकरे यांच्यावर ऑपरेशनचे संकट आले होते. पण तरीही ते काम सुरू करत आहेत," अशा शब्दांत पवार यांनी उद्धव यांचे कौतुक केलै आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com