महाविद्यालय दिवाळीनंतर सुरू करण्याचा विचार : उदय सामंत
uday samantDainik Gomantak

महाविद्यालय दिवाळीनंतर सुरू करण्याचा विचार : उदय सामंत

CET परीक्षेपासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही.

राज्यात काही जिल्ह्यात गेल्या २ दिवसपासून अतिवृष्टी सुरु आहे. त्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या अतिवृष्टीमुळे सीईटी परीक्षा जे विद्यार्थी देऊ शकले नाही. अशा विद्यार्थ्यांना परिक्षेकरिता पुन्हा संधी देण्यात येणार आहे. अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. या नैसर्गि‍क आपत्तीमुळे काही विद्यार्थी परीक्षेला बसू शकले नसल्याने किंवा तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा पूर्ण करु शकले नाहीत.

अशा उमेदवारांनी ई- मेलद्वारे, कार्यालयीन दूरध्वनी, केंद्र प्रमुख भेट आणि स्वत: सीईटी कक्षात येवून प्रत्यक्ष भेटी दरम्यान परीक्षा देवू न शकल्याचे विविध कारण सीईटी कक्षाकडे नोंदविले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना कोरोना, साथीच्या रोगमुळे परीक्षा केंद्रावर पोहचण्यास अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या.

uday samant
1 नोव्हेंबरपासून राज्यातील महाविद्यालय सुरु: Uday Samant

टास्क फोर्ससोबत चर्चा करून, एसओपी बनवण्यात येणार आहे. आणि मुख्यमंत्र्यांच्या संमतीनंतर निर्णय घेण्यात येतील. १ नोव्हेंपासून शैक्षणिक वर्ष सुरु होईल. परंतु, तेव्हाच दिवाळी येत असल्याने कदाचित दिवाळीनंतर शैक्षणिक वर्ष सुरू होईल. तेव्हाच फिजिकल कॉलेज सुरू करण्याचा विचार होत आहे. विद्यार्थ्यांनी यायचे की नाही, हे त्यांनी ठरवावे. सक्ती नसणार आहे. कोरोना कमी झालेला आहे. तिथं कॉलेज सुरू करायला काहीच अर्थ नाही. पण याकरता मुख्यमंत्र्यांची परवानगी लागणार आहे.

दिवाळीनंतर कोरोनाची परिस्थिती पाहूनच महाविद्यालये (Colleges)सुरू करण्याचा विचार आहे. आता मात्र ऑनलाईन (Online)पद्धतीनेच ॲकॅडमिक इयर चालू होतील. ज्या भागात कोरोनाचा (covid 19)प्रादुर्भाव कमी आहे त्या भागात कॉलेज चालू करण्यास काही अडचण नाही. परंतु सर्वच भागात कॉलेजेस एकत्र सुरु होणे गरजेचे आहे.CET परीक्षा पुढे गेली तर महाविद्यालय सुरू होण्यास उशीर होईल. तरीही CET परीक्षेपासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही.

उदय सामंत माध्यमांशी बोलताना म्हणाले:

  • दिवाळीनंतर कोरोनाची परिस्थिती पाहूनच महाविद्यालये (Colleges)सुरू करण्याचा विचार आहे.

  • आता मात्र ऑनलाईन (Online)पद्धतीनेच ॲकॅडमिक इयर चालू होतील.

  • ज्या भागात कोरोनाचा (covid 19)प्रादुर्भाव कमी आहे त्या भागात कॉलेज चालू करण्यास काही अडचण नाही.

  • परंतु सर्वच भागात कॉलेजेस एकत्र सुरु होणे गरजेचे आहे.

  • CET परीक्षा पुढे गेली तर महाविद्यालय सुरू होण्यास उशीर होईल.

  • तरीही CET परीक्षेपासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही.

Related Stories

No stories found.