गणपतीपुळेला निघालेल्या तीन मित्रांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 5 जानेवारी 2021

रत्नागिरी जिल्हातील गणपती पुळे येथे दर्शनासाठी निघालेल्या तरुणांच्या कारचा अपघात झाला आहे.

वर्धा: रत्नागिरी जिल्हातील गणपती पुळे येथे दर्शनासाठी निघालेल्या तरुणांच्या कारचा अपघात झाला आहे. वर्धा येथिल राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी रात्री हा भीषण अपघात झाला. अपघात एवढा गंभीर होता की, कारचा चक्काचूर झाला. अक्षरश: पूर्णपणे चेंदामेंदा झाली. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहे. राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या रेल्वे पुलाजवळ रात्री साडे अकराच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.

नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातल्या हिवरा गावचे हे तरुण गणपती पुळे येथे दर्शनासाठी निघाले होते. रेल्वे पुलाजवळ येत असताना त्यांची बोलेरो गाडी तिथे उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली. अपघातात वाहनचालक शैलेश पंढरी गिरसावले (२६), आदर्श हरिभाऊ कोल्हे (१७), सूरज जनार्दन पाल (२१) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून यश कोल्हे, भूषण खोंड, शुभम पाल, प्रणय कोल्हे, समीर कोल्हे, मोहन मुंढे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर सेवाग्राम येथिल रुग्णालयात उपचार सुरू आहे.

 आणखी वाचा:

महाराष्ट्रीयन तरुणाचा आयर्लंडच्या फेसबुक अधिकाऱ्यांनी वाचवला जीव -

 

संबंधित बातम्या