Sindhudurg Shivsena: सिंधुदुर्गात ठाकरे गटाच्या तीन उपजिल्हा प्रमुखांचा शिंदे गटात प्रवेश

ठाकरे गटाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठे खिंडार पडले आहे.
Chief Minister Eknath Shinde
Chief Minister Eknath ShindeDainik Gomantak

महाराष्ट्रातील शिवसेनाचा वाद दिवसेंदिवस नवे वळण घेताना दिसत आहे. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला 'शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे' असं नाव मिळाले असून, 'मशाल' चिन्ह मिळाले आहे. तर, शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' असं नाव मिळाले आहे. शिंदे गटाची चिन्हासाठी अजून प्रतिक्षा करावी लागणार आहे. अशात ठाकरे गटाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठे खिंडार पडले असून, ठाकरे गटाचे तीन उपजिल्हा प्रमुखांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

Chief Minister Eknath Shinde
Shiv Sena: शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' हे नाव, तर ठाकरे गट आता 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे'

ठाकरे गटाचे तीन उपजिल्हा प्रमुख सचिन देसाई, सुनील डुबळे, बाळा दळवी यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत तीन उपजिल्हा प्रमुखांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामुळे ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का बसला आहे. शिवसेना पक्षाचे चिन्ह आणि नाव गोठवल्यानंतर दोन्ही गटांना नवीन नाव आणि चिन्ह दिले जात आहे. अंधेरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी हा बदल करण्यात आला आहे. त्यानंतर दोन्ही गटात मोठ्या हलचाली पाहायला मिळत आहेत.

Chief Minister Eknath Shinde
Maharashtra Politics: शिंदे गटाला कोणतं चिन्ह मिळणार? निवडणूक आयोगाच्या घोषणेची प्रतीक्षा

दरम्यान, शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' असे नाव मिळाले आहे. मात्र, शिंदे गटाने चिन्हासाठी दिलेले तिन्ही पर्याय फेटाळून लावले आहेत. त्यानंतर तळपता सूर्य, ढाल तलवार आणि पिंपळाचे झाड असे पर्याय शिंदे गटाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. तळपता सूर्य हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला मिळण्याची अधिक शक्यता वर्तवली जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com