
To take revenge, Cook shocks the teacher in Mumbai apartment:
अंधेरीच्या एका ४२ वर्षीय शिक्षिकेला कथितरित्या झोपेतून उठवत तिच्या कूकने तिच्यावर हल्ला करत विजेचे शॉक दिले. यानंतर 'अब कैसा लग रहा है?' असे पीडितेला आरोपीने विचारले.
आरोपी राजू सिंग (२५) याने त्याच्या या कृत्याबद्दल पीडित शिक्षिकेची माफी मागितल्यानंतर घर सोडले. हा सर्व प्रकार एक तास चालला.
पीडित शिक्षिका बेथशीभा सेठ यांनी पोलिसांना सांगितले की, कूक सिंगल याला मी याआधी काम व्यवस्थित न केल्याने ओरडले होते. त्यामुळे त्याला मला धडा शिकवायचा होता. सेठच्या अल्पवयीन मुलाने ही सर्व घटना पाहिला तर तिचा दुसरा मुलगा घरी नव्हता.
पीडित शिक्षिका बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समधील एका आंतरराष्ट्रीय शाळेत काम करते. पोलिसांनी फरार झालेल्या सिंगचा शोध सुरू केला आहे. तो जोगेश्वरी येथे आपल्या भावाच्या घरी राहत होता. सिंग याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंधेरी पश्चिम येथील उच्चभ्रू सोसायटीत सेठ यांच्या १३व्या मजल्यावरील फ्लॅटमधील बेडरूममध्ये रविवारी दुपारी हा गुन्हा घडला.
या गुन्ह्याची गंभीर दखल घेत, पोलीस अधिकारी कृष्णकांत उपाध्याय यांनी गेल्या दोन वर्षांपासून सेठ यांच्याकडे कूक म्हणून काम करणाऱ्या सिंगचा माग काढण्यासाठी कारवाई सुरू केली आहे.
"पीडित शिक्षिका रविवारी दुपारी तिच्या बेडरूममध्ये झोपली होती आणि तिचा मुलगा दुसर्या खोलीत होता. तेव्हा आरोपी सिंगने त्याला दिलेली अतिरिक्त चावी वापरून फ्लॅटमध्ये प्रवेश केला.
सिंग नेहमी संध्याकाळी 6.30 ते 7.15 च्या दरम्यान स्वयंपाक करायला येत. पण रविवारी तो दुपारीच न सांगता फ्लॅटमध्ये घुसला.
तक्रारीत सेठ म्हणाल्या, "मला जाग आली आणि सिंगला स्विच सॉकेटमध्ये लावलेली वायर हातात पकडलेली पाहून धक्का बसला. माझ्या लक्षात आले की त्याने हातमोजे घातलेले आणि हातात वायर धरली होती. काही क्षणात त्याने माझ्या उजव्या हातावर वायर टाकली त्याने मला विजेचा झटका बसला. त्यानंतर त्याने मला विचारले, 'अब कैसा लग रहा है (आता तुला कसे वाटते) ?'
"त्याने माझा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. हाणामारी दरम्यान, माझे डोके जमिनीवर आदळले. माझी आरडाओरड ऐकून दुसऱ्या खोलीत झोपलेला माझा मुलगा धावत आला. सिंग त्याच्यावरही हल्ला करेल या भीतीने मी त्याला त्याच्या खोलीत परत जाण्यास सांगितले. अचानक, सिंगने माझ्यावर हल्ला करणे थांबवले, आणि खाली बसला. माझ्या मुलासमोर माझी माफी मागू लागला आणि म्हणाला, 'मैंने ये क्या किया, मुझे ऐसा नहीं करना था'," असे महिला शिक्षिकेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.