"कोकण पर्यटन अजूनही कोरोनाच्या छत्रछायेखाली"

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 8 जानेवारी 2021

राज्यातील कोरोनाचं सावट कमी झालं असलं तरी कोकणातील  पर्यटनाला पर्यटकांकडून अजूनही मनावा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही.

सिंधुदुर्ग : राज्यातील कोरोनाचं सावट कमी झालं असलं तरी कोकणातील  पर्यटनाला पर्यटकांकडून अजूनही मनावा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही.शासनाने पर्यटनस्थळे खुली केली असली तरी कोरोनाच्या भीतीदायक वातावरणमुळे पर्यटकांनी नववर्षाच्या स्वागताला ही कोकणातील पर्यटन स्थळांना अल्प प्रतिसाद दिला आहे.नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कोकणात मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करतात. मात्र गेल्या अॉक्टोबर महिन्यात वाढलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पर्यटन स्थळे ओस पडलेली आपल्याला दिसली.

शासनाने दिवाळी पाडव्याच्या मुहुर्तावर मंदीरं उघडण्याची परवानगी दिल्यानंतर रत्नागिरीतील प्रसिद्द पर्यटन स्थळ असलेल्या गणपतीपुळेमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक आले.नाताळच्या सुट्टीत गणपतीपुळेसारख्या पर्यटनस्थळी हजारो पर्यटकांनी हजरी लावली होती.यंदा मात्र पर्यटकांनी गणपतीपुळ्याकडे पाठ फिरवली आहे.दरवर्षीच्या तुलनेत सुमारे 50 ते 70% पर्यटकांनी हजेरी लावल्यामुळे एकूण उलाढाल पन्नास टक्केचं झाली आहे.

पर्यटन जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही पर्यटक संख्या रोडावली आहे.सिंधुदूर्गचा किल्ला पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे,मात्र या कोरोनाच्या भितीमुळे पर्यटकांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे.मागील काही वर्षाच्या तुलनेत डिसेंबर महिन्यात सिंधुदूर्गला भेट देणाऱ्यांची संख्याही या हंगामात खूपच रोडावली आहे.

 

अधिक वाचा :

महाराष्ट्रात बळीराजाला सुगीचे दिवस कधी येणार?.. गेल्या ११ महिन्यात २,२७० शेतकऱ्यांच्या आत्महत्या

औरंगाबाद नाही.. संभाजीनगर ! काय म्हणाले आदित्य ठाकरे..

संबंधित बातम्या