येवा कोकण आपलाच असा! माशांच्या खरेदीसाठी पर्यटकांची लगबग

याचवेळेस मासळीची आवक मंद झाल्याने बंदारामध्ये असणाऱ्या चिमणी बाजारामध्ये (Chimney Market) मासळी खरेदी करण्याचे आकर्षण पर्यटकांमध्ये दिसून येत आहे.
येवा कोकण आपलाच असा! माशांच्या खरेदीसाठी पर्यटकांची लगबग
Fish MarketDainik Gomantak

महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनामुळे (Covid 19) पर्यटन उद्योगाला गेल्या दिवसांपासून बऱ्यापैकी सुरुवात झाली असताना पर्यटकांची आवक वाढू लागली आहे. यातच आता ठाकरे सरकारने उठवलेल्या निर्बंधामुळे कंटाळलेले पर्यटक वेळात वेळ काढून ताजी मासळी आणि सुकी मासळी खरेदी करण्यासाठी हजेरी लावू लागले आहेत. याचवेळेस मासळीची आवक मंद झाल्याने बंदारामध्ये असणाऱ्या चिमणी बाजारामध्ये (Chimney Market) मासळी खरेदी करण्याचे आकर्षण पर्यटकांमध्ये दिसून येत आहे.

दरम्यान, शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेला दाभोळ ते केळशी पर्यंतचा समुद्र किनारा यामुळे दापोलीला (Dapoli) पर्यटनदृष्ट्या जगाच्या नकाशावर एक महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. मात्र राज्यात कोरोनाचा धोका कमी झाल्याने पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटक पुन्हा बाहेर पडू लागले आहेत. सलग आलेल्या सुट्टीच्या निमित्ताने शुक्रवारच्या पूर्वसंध्येला पर्यटकांनी हजेरी लावली आहे. लॉकडाऊनच्या काळात कंटाळलेले पर्यटक फिरण्यासाठी दापोलीमध्ये येऊ लागले.

Fish Market
शाळा सुरु करतांना ठाकरे सरकार करणार विशेष ‘हेल्थ क्लिनिक’!

तसेच, दापोलीमध्ये आलेला पर्यटक हर्णे बंदरामध्ये आल्याशिवाय माघारी परतत नाही. ऑगस्टपासून मासेमारीला काहीशी सुरुवात झाली परंतु सुरुवातीस बसलेल्या वादळांच्या तडाख्यांमुळे मागील दोन महिन्यात मासळीची आवक मंदावली होती. मात्र मागील दोन दिवसांपासून वातावरणात काहीशी शांतता आल्याने मच्छीमार मासेमारी करण्यासाठी समुद्रामध्ये जायला लागले आहेत. परंतु दैनंदिन जाणाऱ्या छोट्या होड्या किरकोळ मासळी मारुन आणत असल्याचेही पाहायला मिळत आहे. दुसरीकडे राज्य शासनाने निर्बंध उठविल्यानंतर पर्यटक पर्यटनासाठी आणि मासळीची खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com