Monsoon Update:कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावरील वाहतूक ठप्प

कोल्हापूरलाही काल रात्रीपासून पावसाने झोडपून काढले आहे. शहरासह ग्रामीण भागांतही पावसाने जोरात हजेरी लावली आहे.
Traffic destroyed on kolhapur gaganbawada road dew to heavy rain
Traffic destroyed on kolhapur gaganbawada road dew to heavy rain Dainik Gomantak

महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात गेले चार पाच दिवसांपासून पावसाचा जोर कायमच वाढताना दिसत आहे. राज्यात अनेक ठिकाणी पावसामुळे वाहतूक विस्कळीत झालेली पाहायला मिळत आहे.

कोल्हापूरलाही काल रात्रीपासून पावसाने झोडपून काढले आहे. शहरासह ग्रामीण भागांतही पावसाने जोरात हजेरी लावली आहे. काल रात्रीपासून जिल्ह्यात पावसाचा जोर कायमच वाढता असल्याने नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ झाली असून धरण क्षेत्रात रात्रभर झालेल्या मुसळधार (heavy rain) पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. याअनुषंगाने हवामान खात्याने जिह्यात पुढील पाच दिवस हाय अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यातील वाहतूक मोठ्या प्रमाणावर ठप्प झालेली पाहायला मिळत आहे.

Traffic destroyed on kolhapur gaganbawada road dew to heavy rain
Konkan Railway: वशिष्ठी नदीच्या पुरामुळे 'या' भागातली वाहतूक बंद

कोल्हापूर- गगनबावडा रस्त्यावरही मांडुकलीजवळ पावसामुळे वाहतूक ठप्प झाली असून शाहूवाडी तालुक्यातील कासारी नदीचे पाणी पुलावर आल्याने बर्की गावाचा देखील संपर्क तुटला आहे. कोकणात जाणार फोंडा घाटात रस्त्यावही पासवसामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे . दरम्यान काल दुसऱ्यांदा पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले. आज सकाळी नदीची पाणीपातळी 35.7 फुटांवर आली आहे त्यातच पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट आहे. गगनबावडा मार्गावर चार ठिकाणी पाणी आल्याने या भाागतील वाहतुक ठप्प झाली असून. पावसाचा वाढत जोर पाहून यापूर्वीच प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com