Mumbai-Goa Expressway: चारकरमान्यांपुढे वाहतूक कोंडीचं विघ्न

Mumbai-Goa Expresswayवर अवजड वाहनांची ये -जा पुर्णत: बंद
Mumbai-Goa Expressway: चारकरमान्यांपुढे वाहतूक कोंडीचं विघ्न
Traffic Jam on Mumbai-Goa ExpresswayDainik Gomantak

मुंबई: 20 सप्टेंबरपर्यंत मुंबई -गोवा महामार्गावर (Mumbai-Goa Highway) अत्यावश्यक वस्तू घेऊन जाणाऱ्यांना वगळता अवजड मालाच्या वाहनांची ये -जा पुर्णत: बंद करण्यात आली, असे पुणे आरटीओ अधिकाऱ्यांनी (RTO) सांगितले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, बंद हा नित्याचा आहे आणि दरवर्षी गणेशोत्सवाच्या दरम्यान केला जातो.

गणेशोत्सवाच्या (Ganesh Chaturthi) पार्श्वभूमिवर मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर सर्व अवजड वाहने ज्यांची वजन क्षमता 16 टन किंवा त्यापेक्षा जास्त आहे. अशी जड वाहने, ट्रक, मल्टी ॲक्सल, ट्रेलर वाहनांची वाहतूक उद्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत पूर्णतः बंद राहणार आहे. दूध, पेट्रोल/डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर, लिक्वीड मेडिलक ऑक्सिजन, भाजीपाला इत्यादी जीवनावश्यक आणि अत्यावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना या नियमांतून सुट मिळमार आहे, अशी माहिती जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी दिली.

Traffic Jam on Mumbai-Goa Expressway
महाराष्ट्राचा अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यास पुन्हा विरोध का?

आता हा मार्ग बंद झाल्याने मुंबई गोवा हायवेर वडखळ ते नागोठणे दरमान्य मोठ्या प्रमाणात वाहतूक समस्या निर्माण झाली आहे. एकीकडे सकाळपासून मोठ्या प्रमाणात कोकणात जाणाऱ्या चाकरमन्यांची संख्या आणि दुसरीकडे रस्त्यावरील मोठं मोठे खड्डे यामुळे अनेक प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यातच एक ते दीड तास ट्रॅफिक मध्ये अडकण्याची वेळ या चाकरमान्यांवर आली आहे. पांडापूर ते वाकण दरमान्य केवळ एक लेन सुरू असल्यामुळे 5 ते 6 किलोमीटर परिसरात मोठ्या प्रमाणात ट्राफीक जाम झाले आहे. सध्या स्थानिक पोलीस प्रशासन वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत.

Traffic Jam on Mumbai-Goa Expressway
सचिन वाजे प्रकरणात NIA च्या हाती मोठं घबाड..

मागील काही वर्षांपासून सुरु असलेले मुंबई गोवा महामार्गावरचे काम अजूनही पूर्ण झालं नाही. त्यातच या महामार्गाचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्याना वाटेत खड्ड्यांचं विघ्न आहे. हा महामार्ग बघायला गेलं तर Mumbai-Goa Express Wayची मोठमोठ्या खड्ड्यामुळे चाळण झाली आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com