इंदापूरमधील कडबनवाडी गावातील शेतात शिकाऊ विमान कोसळले; महिला पायलट जखमी

Pune Indapur aircraft accident: पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी गावातील शेतात येथे कारवार एव्हीएशनचे विमान कोसळले.
Pune Indapur aircraft accident:
Pune Indapur aircraft accident:twitter

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी गावातील शेतात येथे कारवार एव्हीएशनचे विमान कोसळले. या अपघातात महिला पायलट भावना राठोड जखमी झाल्या आहेत. बारामतीतील कार्व्हर एव्हीएशन मार्फत प्रशिक्षण दिलं जातं. सकाळी विमानाने बारामतीतून उड्डाण केल्यानंतर अचानक या विमानातील इंधन संपले आणि ते इंदपूर तालुक्यातील कडबनवाडी येथील बारहाते यांच्या शेतात कोसळले. (Pune Indapur Aircraft Accident News)

यामध्ये महिला (Women) पायलट किरकोळ जखमी झाली आहे. त्यांच्यावर इंदापूर तालुक्यातील शेळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या घटनास्थळी कारवार एव्हिएशन बारामती (Baramati) यांचे स्टाफ हजर असून पोलिसांनी योग्य बंदोबस्त घटना ठिकाणी ठेवला आहे. हे विमान दादाराम आबाजी बाराते यांच्या शेतात कोसळले. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आहे. विमान पाहण्यासाठी गावकऱ्यांनी एकच गर्दी केली आहे.

Pune Indapur aircraft accident:
Crime: धारावीत कबड्डीपट्टू ची दोन युवकांन कडून हत्या

ही घटना समजताच शेजारील पोंदकुले वस्तीवरील तरुण त्या ठिकाणी पोचले त्यांनी महिला पायलटला सुरक्षितरित्या विमानामधुन बाहेर काढले. या महिला पायलटला किरकोळ जखमा झाल्या असून, बाकी विमानाची मात्र दुरावस्था झाली आहे. या ठिकाणी बारामतीतून अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे पथक तिथे पोहोचले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com