पडणार होता 50 कोटींचा पाउस पण; मुलीच्या हुशारीने टळली मोठी दुर्घटना

Tried to take off girls clothes for 50 crore rupees by following black magic
Tried to take off girls clothes for 50 crore rupees by following black magic

नागपूर: महाराष्ट्रातील नागपूरमध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे, जेथे काही लोकांनी मुलीला 'जादू टोण्या' च्या बहाण्याने 50 कोटी रुपयांचा 'पैशाचा पाऊस' पाडण्याचे आमिष दाखविले. या बहाण्याने आरोपींनी मुलीचे कपडे काढण्याचा प्रयत्न केला पण त्यांची ही एक चूक त्यांच्यावर भारी पडली.  या प्रकरणातील आता पाच आरोपी तुरूंगात आहेत. एनवेळी मुलीच्या समजदारीने तीच्यासोबत होत असेलीली ही वाईट घटना टळली.

मुलीच्या हुशारीने टळली मोठी दुर्घटना

मिळालेल्या माहितीनुसार आपल्या तक्रारीत मुलीने असे म्हटले आहे की,  काही दिवसांपूर्वी तिला श्रीमंत होण्याचे स्वप्न दाखविणारी एक व्यक्ती भेटली होती आणि त्यासाठी त्याने काही अटी ठेवल्या होत्या. आरोपींनी असे म्हटले होते की, आम्ही सांगितलेल्या या अटी पूर्ण केल्यास ती श्रीमंत होईल आणि जादूटोणा केल्याने आकाशातून 50 कोटी रुपयांचा पाऊस पडेल. या सगळ्या प्रलोभनामुळे ती मुलगी आरोपीच्या बोलण्यात फसली, परंतु जेव्हा आरोपींनी पीडित मुलीला कपडे काधायला सांगितले तेव्हा तिला काहीतरी शंका झाली. 

पोलिसांनी केली अटक

मुलीने त्या आरोपींनी सांगितलेल्या गोष्टीकडे लगातार दुर्लक्ष करूनही आरोपींनी तिच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पीडित मुलीने पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. लकडगंज पोलिसांनी तपास करत या पाच आरोपींना अटक केली आणि त्यांच्याविरूद्ध ब्लॅक मॅजिक अ‍ॅक्ट, पॉक्सो आणि इतर कायद्यांनुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींची नावे विक्की गणेश खापरे (वय 20), दिनेश महादेव निखारे (वय 25), रामकृष्ण दादाजी म्हसकर (वय 41), विनोद जयराम मसराम (वय 42) आणि डीआर उर्फ ​​सोपान हरिभाऊ कुमरे (वय 35) अशी आहेत. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com