जळगावात ट्रक पलटी झाल्याने 15 मजूर जागीच ठार

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात ट्रक पलटी झाल्याने मोठा अपघात झाला आहे. ही घटना काल मध्यरात्री दिडवाजताच्या सुमारास घडली आहे.

जळगाव: महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात ट्रक पलटी झाल्याने मोठा अपघात झाला आहे. ही घटना काल मध्यरात्री दिडवाजताच्या सुमारास घडली आहे. या अपघातात 16 मजूर ठार झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेबाबत पंतप्रधान मोदीॆनी ट्विट करून शोक व्यक्त केला आहे.

हे सर्व मजूर जळगाव जिल्ह्यातील अभोदा, केरळा आणि रावेर येथील असल्याची माहिती पोलिसांनी दिली. किंनगाव गावाजवळील मंदिराजवळ मध्यरात्री पपईने भरलेला ट्रक पलटी झाल्यामुळे हा भीषण अपघात झाला. आणि या अपघातात मजुरांचा मृत्यू झाला. पाच मजूर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मोठ्या प्रमाणात पपई अंगावर पडल्याने आणि ट्रक पलटी झाल्याने या  अपघातात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे.

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात किनगाव जवळ पपईची वाहतूक करणारा आयशर ट्रक उलटून 16 जणांचा मृत्यू झाल्याची घटना मध्यरात्री दीड वाजता घडली आहे. या अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अपघात मजूरांचा ट्रक धुळे जिल्ह्यातील नेर येथून चोपडा मार्गे रावेरला जात होता. मध्यरात्रीच्या किनगाव येथे अचानक ट्रक पलटी झाला. या अपघातात 16 जण जागीच ठार झाले तर काही जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन चिमुकल्यांचाही समावेश आहे. या ट्रकमध्ये एकूण 21 मजूर असल्याची माहिती आहे.

 

संबंधित बातम्या