सिंधुदुर्गात मशिनव्दारे कोवीड-१९ ची तपासणी

trunet test
trunet test

ओरोस

जिल्हा सामान्य रुग्णालयात ट्रुनॅट मशिनव्दारे कोवीड-१९ ची तपासणी सुरु झाली आहे. मात्र, ही तपासणी निगेटिव्ह असलेल्या रुग्णांसाठी कन्फॉम असणार आहे. तर या टेस्टद्वारे पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची तपासणी सीबीनॅट मशिन किंवा आर. टी. पी. सी.  आर. मशीनद्वारे कन्फॉम करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी दिली. 

यावेळी आमदार वैभव नाईक,  जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांनी आज जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, रेण्वीय निदान प्रयोगशाळेचे मुख्य वैद्यककीय अधिकारी डॉ. उल्हास लोखंडे, डॉ. पी.एम. मोरे व तंत्रज्ञ श्री. परब यांच्या उपस्थितीत यंत्र सामुग्रीची पाहणी करण्यात आली.

जिल्हा सामान्य रुग्णालयात ट्रुनॅट मशीनद्वारे स्वॅब तपासणीची इंडियन कौंन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, दिल्ली (आय.सी.एम.आर) कडून परवानगी देण्यात आली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये सद्या ट्रुनॅट एक मशीन व सिबी नॅट कोवीड – १९ एक, अशा दोन तपासणी मशीन उपलब्ध आहेत. त्याद्वारे कोरोना तपासणी करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी जाहिर केला आहे.

माकडताप लॅबही कार्यान्वीत

याचवेळी जिल्ह्यातील बहुप्रतिक्षीत माकड तापाचे (के.एफ.डी.) निदान करणारी प्रयोगशाळाही कार्यान्वीत झालेली आहे. यापूर्वी माकड ताप नमुने तपासणीसाठी एन.आय.बी.पुणे किंवा मनीपाल रुग्णालय, गोवा यांच्याकडे पाठविण्यात येत होते. आता ही लॅब कार्यान्वीत झाल्यामुळे हे नमुने स्थानिक पातळीवर तपासता येणार आहेत. तसेच या लॅब मध्ये लॅप्टोस्पारोसिस, डेंग्यू आणि चिकुन गुनिया या आजारांची तपासणी करता येणार आहे. यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाचे प्रशिक्षण एन.आय.बी.पुणे कडुन झाले आहे. तसेच लागणारे इतर मशिन्स लवकरच प्राप्त होणार आहेत.

एका तासात दोन तपासण्या

 या दोन्ही मशिनव्दारे एका तासात दोन तपासणी होवू शकतात. ट्रुनॅट मशीनव्दारे स्वॅब तपासल्यानंतर याची स्क्रिनींग टेस्ट होऊन निगेटीव्ह किंवा पॉजिटीव्ह स्वॅब रिपोर्ट मिळतो. जर निगेव्टीव रिपोर्ट असेल तर तो कर्न्फम रिपोर्ट असतो तर पॉजिटीव्ह रिपोर्ट आला तर हा रिपोर्ट कन्फर्म करण्यासाठी  सीबीनॅट मशिन किंवा आर. टी. पी. सी.  आर. मशीनमध्ये तपासणीसाठी पाठवणे आवश्यक असते. या दोन्ही मशिनव्दारे स्वॅब टेस्टींग सुरु करण्यात आली आहे तसेच त्यासाठीचे प्रशिक्षण एन.आय.बी.पुणे यांचे कडून देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com