Fandanvis Statement: बेळगाव, निपाणी, कारवार महाराष्ट्रात घेण्याचा प्रयत्न, देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य

तीव्र पाणी टंचाईमुळे सांगलीच्या जत तालुक्यातील 40 ग्रामपंचायतींनी कर्नाटकात सामील होण्याचा ठराव केला आहे.
देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीसDainik Gomantak

"बेळगाव, कारवार, निपाणीसह तिकडे असलेले गावं सर्वोच्च न्यायालयात लढून महाराष्ट्रात घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच, महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाऊ देणार नाही." असे वक्तव्य महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadanvis) यांनी केले आहे.

देवेंद्र फडणवीस
POK परत घ्यायला सज्ज, फक्त आदेशाची वाट पाहतोय; लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांचं मोठं वक्तव्य

तीव्र पाणी टंचाईमुळे सांगलीच्या जत तालुक्यातील 40 ग्रामपंचायतींनी कर्नाटकात सामील होण्याचा ठराव केला आहे. या ठरावावर कर्नाटक सरकार गांभीर्यानं विचार करत असल्याचं कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज यांनी म्हटलं आहे. याबाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर येथे प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाऊ देणार नाही, असे म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस
Casinos in Mandovi: मांडवीतील कॅसिनो आणि थकीत वीज बिलाबाबत गोवा मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

"महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाऊ देणार नाही. सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) लढून बेळगाव, कारवार, निपाणीसह तिकडे असलेले गावं घेण्याचा आमचा प्रयत्न आहे," असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

तसेच, जतमधील गावांनी कर्नाटकात जाण्याचा ठराव 2012 मधला असून, तो आता केलेला नाही. या गावांना पाणी देण्यासाठी म्हैसाळच्या सुधारित योजनेत घेण्याचा निर्णय घेतला आहे. असेही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com