आचरा-मालवण मार्गावरील भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

मात्र घटनास्थळावरील नागरिकांनी जखमींना रिक्षामधून आचरा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये (Primary Health Center) दाखल केले.
आचरा-मालवण मार्गावरील भीषण अपघातात दोघांचा मृत्यू
Malvan- Achara AccidentDainik Gomantak

मालवण- आचरा मार्गावर (Malvan- Achara) आचरा हायस्कूलजवळ काल रात्री भरधाव वेगाने जाणाऱ्या गाडीने चालत जात असलेल्या तीघांना उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण अपघातामध्ये दोघांचा उपचारादरम्यानच मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये पोलिस उपनिरिक्षक दीपक लोणे (Sub-Inspector of Police Deepak Lone), जमेंदर प्रसाद (Jamender Prasad) यांचा समावेश आहे. अपघातामध्ये दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कणकवली (Kankavali) जानवली येथील कृष्णा राणेच्या (Krishna Rane) विरोधात आचरामधील पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटकही करण्यात आली आहे. दरम्यान अपघातामधील गाडीही आचरा पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

Malvan- Achara 
Accident
Mumbai Drug Case: मध्यरात्री NCB ची छापेमारी, एकाला अटक

दरम्यान, सुट्टीसाठी आलेले लोणे हे रात्री दहाच्या सुमारास आचरा तिठा येथून जेवण करुन आपल्या मुली परी आणि मठाचे आचारी जमेंदर प्रसाद यांच्याबरोबर घरी पायी परतत असताना पाठीमागून आलेल्या भरधाव गाडीने तिघांनाही जोरदार अशी धडक दिली. मात्र घटनास्थळावरील नागरिकांनी जखमींना रिक्षामधून आचरा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल केले.

तसेच, यात पोलिस उपनिरिक्षक दीपक पुरुषोत्तम लोणे यांच्या डोक्याला आणि कमरेला गंभीर दुखापत झाली. त्याचबरोबर मठाचे आचारी जमेंदर प्रसाद यांच्या डोक्याला आणि डाव्या हाताला जोरदार मार लागला आहे. त्यामध्ये लोणे यांची मुलगी परी दीपक लोणे हिच्या डाव्या हाताच्या कोपराला आणि पोटाला गंभीर दुखापत झाली आहे. मात्र तिघांनाही झालेल्या गंभीर दुखापतीमुळे रात्रीच कणकवली येथील रुग्णालयामध्ये हलविण्यात आले. दरम्यान आचरा पोलिसांनी भरधाव वेगाने गाडी चालविणाऱ्या कृष्णा राणे याला अटक केली आहे.

Related Stories

No stories found.