Mumbai: तेरा वर्षीय मुलीवर शाळेत बलात्कार, आठवीतील दोन मुले पोलिसांच्या ताब्यात

मुलांनी परिस्थितीचा गैरफायदा घेत मुलीवर लैंगिक अत्याचार केला.
Crime News
Crime NewsDainik Gomantak

महाराष्ट्रातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तेरा वर्षीय मुलीवर दोन अल्पवयीन मुलांनी शाळेतच बलात्कार (Girl Raped In School) केला आहे. याप्रकरणी इयत्ता आठवीत शिक्षण घेणाऱ्या दोन मुलांना मांटुंगा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. माटुंगा (Matunga) येथील शाळेत 30 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली.

Crime News
Sidhu Moose Wala Case: सिद्धू मूसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रार ताब्यात

मिळालेल्या माहितीनुसार, इयत्ता आठवीत शिकणाऱ्या दोन मुलांनी तेरा वर्षीय मुलीवर बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांना दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम 376 (D) आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मुलांना बाल न्यायालयापुढे सादर केल्यानंतर त्यांना डोंगरी येथील बाल सुधारगृहात रवानगी पाठवण्यात आले आहे.

Crime News
Chorla Ghat: चोर्ला घाटात महाराष्ट्रातील कारचा भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

वर्गातील सर्व मुले-मुली नृत्य सरावासाठी बाहेर गेल्यानंतर, या दोन मुलांनी परिस्थितीचा गैरफायदा घेत मुलीवर लैंगिक अत्याचार केला. असे माटुंगा पोलिसांनी म्हटले आहे. या धक्कादायक प्रसंगामुळे धक्का बसलेल्या मुलीने घडलेला प्रसंग आपल्या कुटुंबियांना सांगितला. मुलीच्या घरच्यांनी तात्काळ पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com