Maharashtra: साडेचार लाखात नवजात बाळाचा सौदा करणाऱ्या दोन महिला गजाआड

Maharashtra News: 15 दिवसांचे बाळ विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन महिलांना अटक करण्यात आली आहे.
Baby
BabyDainik Gomantak

Mumbai: 15 दिवसांचे बाळ विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही महिला झिऑन परिसरातील एका नर्सिंग होममध्ये 4.5 लाख रुपयांना सौदा करत होत्या. याच दरम्यान मुंबई पोलिसांनी ज्युलिया फर्नांडिस (35 वर्षे) आणि शबाना शेख (30 वर्षे) यांना रंगेहात पकडले.

दरम्यान, जयप्रकाश जाधव नावाच्या व्यक्तीने याबाबत तक्रार केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तो पुण्यातील एका दत्तक केंद्रात काम करतो. मुंबईतील (Mumbai) एका महिलेला मुलीची विक्री करायची असल्याची माहिती त्याला मिळाली. त्यानंतर त्याने ही माहिती बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. यासंबंधीची माहिती मुंबई पोलिसांना मिळताच त्यांनी या महिलांना पकडण्यासाठी सापळा रचला.

Baby
अश्लील व्हिडिओ बनवून महिलांना Blackmail करणाऱ्या 19 वर्षीय तरुणाला अटक

दुसरीकडे, तक्रारदाराने ज्युलियाशी फोनवरुन संवाद साधला असता तिने साडेचार लाख रुपयांची मागणी केली होती. यातील 4 लाख रुपये मुलीच्या पालकांना द्यायचे होते तर उर्वरित रक्कम स्वत:कडे ठेवणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ज्युलियाने तक्रारदाराला नर्सिंग होममध्ये बोलावले. यानंतर तक्रारदाराची पत्नी म्हणून एक महिला पोलिस कर्मचारी तिथे पोहोचल्या. त्यानंतर त्यांनी बाळ आपल्या ताब्यात घेतले. शेवटी पोलिसांनी दोन्ही महिलांना रंगेहाथ पकडून अटक केली.

Baby
महाराष्ट्रातील व्यक्तीच्या हत्येप्रकरणी वास्को येथील 19 वर्षीय तरुणाला अटक

शिवाय, आरोपी महिलांवर मानवी तस्करीशी संबंधित कलमे लावण्यात आली आहेत. याआधीही ज्युलियाला अशाच प्रकरणात अटक करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. दुसरीकडे, आरोपीने (Accused) सांगितले की, 'नवजात बाळ दिल्लीतील एका जोडप्याचे होते.' पोलिसांनीही (Police) पालकांचा शोध सुरु केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com