मुख्यमंत्र्यांकडून पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींचे पॅकेज जाहीर

गोमंतक वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानातून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी १० हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे. 

मुंबई: अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानातून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी १० हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे. 
फळपीक नुकसानग्रस्तांसाठी हेक्टरी २५ हजारांची मदत केली जाणार आहे. रस्ते आणि पुलांसाठी २ हजार ६३५ कोटींची तर पाणी पुरवठ्यासाठी 
१ हजार कोटींची तरतूद करण्यात आली असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर कोलं.

याआधी मुख्यमंत्र्यांसह सत्ताधारी व विरोधकांनीही गेल्या काही दिवसांत अनेक आपत्तीग्रस्त भागांची पाहणी करत शेतकऱ्यांची ही परिस्थिती जाणून घेतली. दोन दिवसांत शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला जाईल, या आश्वासनानुसार, आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत १० हजार कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला.

संबंधित बातम्या