"ममता बॅनर्जी यांच्या हिमतीला दाद द्यावी लागेल"

दैनिक गोमंतक
रविवार, 2 मे 2021

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले आहे.

पश्चिम बंगालच्या विधान सभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा बहुमत मिळाले असल्याचे पाहायला मिळते आहे. देशाचे लक्ष लागू असलेल्या या निवडणुकीच्या निकालानंतर देशभरातून ममता बॅनर्जी यांच्या विजयाबद्दल त्यांना शुभेच्छा देत असल्याचे पाहायला मिळते आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले आहे. (Uddhav Thackeray congratulated Mamata Banerjee on her victory in the elections)

West Bengal Results: निवडणूक जिंकवणारा "खेला होबे" हा नारा आला कुठून ?

स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह केंद्रीय मंत्र्यांचा मोठा फौजफाटा पश्चिम बंगालच्या निवडणूक प्रचारासाठी उतरलेला निवडणूक काळात पाहायला मिळाला होता. तर दुसरीकडे ममता बॅनर्जी यांनी देखील खेला होबे म्हणत भाजपला जोरदार टक्कर दिल्याचे पाहायला मिळाले. "बंगाली जनतेच्या स्वाभिमानासाठी ममता बॅनर्जी या एकाकी लढत होत्या आणि अखेर त्यांचा आज विजय झाला. ममता बॅनर्जी यांच्या हिमतीला दाद द्यावी लागेल असे मत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी व्यक्त केले आहे. देशभरातून ममता बॅनर्जी यांच्या विजयाचे कौतुक होत असल्याचे पाहायला मिळते आहे. 

दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस (Trinmool Congress) पक्षाला बहुमत मिळाले असून पश्चिम बंगालमध्ये आता तिसऱ्यांदा तृणमूल काँग्रेसचे सरकार येणार आहे. ममता बॅनर्जी या तिसऱ्यांदा पाश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करून ममता बॅनर्जी यांचे अभिनंद केले आहे. 

संबंधित बातम्या