विमानतळाला बाळासाहेबांचं नाव देणं हा उद्धव ठाकरेंचा बालहट्ट; भाजपची टिका

udhav.jpg
udhav.jpg

नवी मुंबई: मुंबईतील अंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील(D B Patil Navi Mumbai) यांचं नाव द्यावं, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे. ठाणे, रायगड, पालघरमधील स्थानिक भूमीपुत्रांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत दि. बा. पाटील यांचं नाव देण्यात यावं, अशी मागणी केली आहे. त्यावरून आता स्थानिक विरूद्ध शिवसेना असा वाद रंगात आला आहे. त्यातच मनसेचे आमदार राजू पाटील यांनी स्थानिकांच्या बाजूने उडी घेतली आहे.(Uddhav Thackeray demand to name the airport after Balasaheb is not correct)

नवी मुंबईच्या विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा आग्रह म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा बालहट्ट आहे. उद्धव ठाकरे हे मोठे नेते आहेत. मात्र त्यांना स्थानिक भूमीपुत्रांबद्दल अजिबातही आस्था नाही. भाजप या मुद्द्यावर राजकारण करत नाही, परंतु आम्ही स्थानिक या भूमीपुत्रांच्या सोबत आहोत, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते रविंद्र चव्हाण यांनी दिली आहे.

नवी मुंबईच्या प्रस्थापित विमानतळाला दि.बा. पाटील यांचं नाव दिलं पाहिजे. स्थानिक भूमिपुत्र म्हणून ही आमची मुख्य मागणी आहे, मनसे आमदार राजू पाटील यांनीही असे मत व्यक्त केले आहे. काही दिवसांपुर्वी राज ठाकरे यांनी नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचं(Chhatrapati Shivaji Maharaj International Airport Mumbai) नाव देण्याच येईल, याबाबत वादविवाद करून अर्थ नाही, असे मत व्यक्त केले होते. त्याचबरोबर राजू पाटील यांनाही त्यांची भूमिका पटली असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं होतं.

दरम्यान, विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी आज सकाळपासून सिडको घेराव आंदोलन मुंबईमध्ये सुरु केलं आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील सिडको कार्यालयाबाहेर पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हातामध्ये दि.बा.पाटील आणि यांच्या नावाच्या समर्थनार्थ पोस्टर, झेंडे घेवून आंदोलनकर्ते मोर्चात सहभागी झाले आहेत. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com