लॉकडाऊन हा उपाय नाही, मात्र... उद्धव ठाकरेंचा सूचक इशारा

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 2 एप्रिल 2021

आरोग्य यंत्रनेसमोर असलेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी येणाऱ्या काळात योग्य निर्णय घेऊ अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी घेतली असल्याचे दिसून यते आहे.

कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे देशभरात पुन्हा चिंताजनक परिस्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळते आहे. त्यातच कोरोना रुग्णांच्या वाढत्या आकड्यांमध्ये देशात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर असल्याचे दिसून येत आहे. याच पार्शवभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी थेट संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन हा उपाय नाही मात्र, महाराष्ट्राची सध्याची परिस्थिती आणि आरोग्य यंत्रनेसमोर असलेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी येणाऱ्या काळात योग्य निर्णय घेऊ अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली.(Uddhav Thackerays warning about lockdown)

पंचतारांकित हॉटेल मधून चालायचे सचिन वाझेंचे वसुलीचे काम ?

कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच जात असल्याने महाराष्ट्रातील परभणी, औरंगाबाद मध्ये लॉकडाऊन लावण्यात आला होता, तसेच पुणे, मुंबई, नागपूर सारख्या मोठ्या शहरांत अंशतः लॉकडाऊन करण्याचे निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. त्यानंतर आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील जनतेला संबोधित केले. येणाऱ्या दोन दिवसांत संबंधित अधिकारी, तज्ज्ञ मंडळी आणि यंत्रणांशी चर्चा करून लॉकडाऊन बद्दलचा निर्णय घेऊ असे म्हणत, उद्धव ठाकरे यांनी यावेळी कडक लॉकडाऊन करण्याचा प्रत्यक्ष इशाराच दिला. होळी पासून राज्यात शिमगा सुरु झाला असून, राजकीय मोर्चे, लग्न, पार्ट्या सुरु असल्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होत जाते आहे. बेड, ऑक्सिजन आणि इतर सर्व गोष्टी आपण वाढवू शकतो. मात्र डॉक्टर आणि इतर अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचाऱ्यांची संख्या आपण लगेच वाढवू शकत नाही, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला मास्क, सोशल डिस्टंसिंग यांसारख्या सुरक्षितेतच्या उपायांचे पालन करण्याचा सल्ला दिला.     

त्यानंतर, अनेक विरोधी पक्ष लॉकडाऊनच्या विरोधात असून ते रस्त्यावर उतरण्याची भाषा करत आहेत. मात्र त्यांना रस्त्यावर जर उतरायचे असेलच तर त्यांनी लोकांच्या मदतीसाठी, आरोग्य यंत्रणेला हातभार लावण्यासाठी रस्त्यावर उतरावे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना उत्तर दिले. याशिवाय, इतर राज्यांत निवडणुका असून सुद्धा त्या राज्यांत कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. परंतु, महाराष्ट्रातील परिस्थिती गंभीर बनत असल्याचे सांगितले जाते, त्यामुळे  महाराष्ट्र हा कोरोनाचे आकडे लपवत नसून, महाराष्ट्रातील खरे आकडे समोर येतात. शिवाय, या प्रश्नावर आपल्याला काहीही बोलायचे नाही असेही त्यांनी पुढे स्पष्ट केले. तसेच महाराष्ट्र कोरोना चाचण्या करण्यात आणि लसीकरण करण्यात देशात सर्वात पुढे आहे असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.  

संबंधित बातम्या