Union Budge: देवेंद्र फडणविसांनी केलं केंद्रीय अर्थसंकल्पाचं विश्लेषण

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 10 फेब्रुवारी 2021

फडणविस यांनी महाराष्ट्राला अर्थसंकल्पातून किती आणि कसा निधी मंजूर झाला कुठल्या कामासाठी हा निधी देण्यात आला याची विस्तृत मांडणी केली आहे. ती पुढीलप्रमाणे...

नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पावर विविध प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. केंद्राच्या या अर्थसंकल्पावर अनेक नेत्यांनी आणि नागरिकांनी आपले मत व्यक्त केले. आज देवेंद्र फडणविस यांनी अर्थसंल्पावर भाष्य केले. निवडणुकीच्या राज्यांचा अर्थसंकल्प असे म्हणत अर्थसंकल्प न वाचता महाराष्ट्राला काहीच मिळालं नाही, अशा अनेक गोष्टी करण्यात आल्या. म्हणून आज मी स्वत: अर्थसंकल्पाचा अभ्यास करुन, त्यातून महाराष्ट्राला काय मिळाले, महाराष्ट्रावर खरच अन्याय झालाय का, याची माहिती घेतली. ती माहिती आपल्यासमोर मांडणार आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणविस आज आयोजीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

फडणविस यांनी महाराष्ट्राला अर्थसंकल्पातून किती आणि कसा निधी मंजूर झाला कुठल्या कामासाठी हा निधी देण्यात आला याची विस्तृत मांडणी केली आहे. ती पुढीलप्रमाणे...

 • 1] 3 लाख 5हजार 611 कोटी रूपये महाराष्ट्राच्या वाट्याला आले आहेत.
 • 2] राज्यातील रस्तेबांधणीसाठी एक लाख कोटींपेक्षा जास्त बजेट मिळाले आहे.
 •    यात 10 हजार किमी पेक्षा जास्त रस्ते बांधले जातील.
 • 3] मुंबईला पिण्याचे पाणी मिळावे या प्रोजेक्टसाठी 3 हजार कोटी रूपये जाहीर.
 • 4] घरोघरी पाणी मिळावे यासाठी 1 हजार कोटी रूपये जाहीर.
 • 5] शेतकरी सन्मान निधी अंतर्गत 6 हजार 823 कोटी
 • यातील जो प्रोजेक्ट सुरू होईल त्यांसाठीची संपूर्ण तरतूद.
 • 6] मुंबई मेट्रो तीन म्हणजे आरे कारशेडवाली यालाही 1832 कोटी रूपये जाहीर.
 • 7] रेल्वे प्रकल्पांसाठी 86696 कोटींची रूपयांची तरतुद झालीय, त्यापैकी यावर्षी 7 हजार कोटी महाराष्ट्राला मिळाले आहेत.
 • 8] बीड परळी लातूर तुळजापूर सोलापूर रेल्वेमार्गालाही पैसे मिळाले आहेत.
 • 9] मुंबईची लाईफलाईन  म्हणजेच लोकलसाठी साडे 6 कोटी रूपये दिले.

पाच वर्षात जो निधी महाराष्ट्राला मिळायला हवा होता, त्याच्या अनेक पट निधी या अर्थसंकल्पात मिळाला आहे. हाच मोदी सरकार आणि दुसऱ्या सरकारमधील फरक आहे. हे शरजीलचे सरकार आहे, त्याला संरक्षण देणारे हे सरकार आहे, असे आम्ही म्हणत असेल तर त्यात काय चूक आहे? हे सरकार कुणाला वाचवू पाहतेय? असे प्रश्न फडणविसांनी राज्य सरकारला केला आहे.

राम मंदिरासाठी निधी जमा करायला गेलेल्या व्यक्तीवर गोळीबार -

"अमित शाहांनी युतीबाबत आपले मत स्पष्ट केले आहे. त्यांनी कोणताही शब्द शिवसेनेला दिला नव्हता. मुंबईतील खड्डे, तुंबणारे पाणी, मुंबई महापालिकेतील बजेटचे आकडे आणि भ्रष्टाचाराचे आकडे याचा कोणताच मेळ बसत नाही. त्यामुळे जनतेला त्याचा काही फायदा होईल असे मला वाटत नाही," असे वक्तव्य फडणविसांनी केले आहे. "केंद्रातील सरकार संवेदनशील आहे. तीरा कामत हा श्रेयाचा मुद्दा नाही, मी पत्र लिहिले, त्यानंतर पीएमओशी संपर्क साधून कागदपत्रांची जुळवाजुळव केली. पाच दिवसात या संबंधी निर्णय जाहीर झाला,"असे म्हणत त्यांनी मोदी सरकारचे आभार मानले.

 

संबंधित बातम्या