केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा आज सिंधुदुर्ग दौरा

Union Home Minister Amit Shah to visit Sindhudurg today
Union Home Minister Amit Shah to visit Sindhudurg today

सिंधुदुर्ग : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये कोकणात भाजपने चांगली कामगिरी करत शिवसेनेला दणका दिला. खासदार नारायण राणे यांच्यामुळे हे शक्य झाल्याने, भारतीय जनता पक्षाचा नारायण राणेंवरील विश्वास दृढ झाल्याच्या चर्चा आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोकण दौऱ्यावर येणार आहेत. दरम्यान, हा दौरा काल म्हणजेच काल 6 फेब्रुवारीला होणार होता, परंतु आंदोलक शतकऱ्यांच्या चक्का जाममुळे हा दौरा एक दिवस पुढे ढकलण्यात आला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे खासदार नारायण राणे यांच्या 150 विद्यार्थी क्षमता असलेल्या मेडिकल कॉलेजचे उद्घाटन करण्यासाठी आज दुपारी १ वाजून ५० मिनिटानी सिंधूदुर्ग जिल्ह्यातील पडवे येथे येणार आहेत. या कार्यक्रमाला अमित शहा यांच्याबरोबरच विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशीष शेलार, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप नेते विनोद तावडे उपस्थित राहणार असल्याची माहिती खासदार नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी   घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

पडवे येथील एस. एस. पी. एम. मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला आमदार नितेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, कुडाळचे माजी नगराध्यक्ष विनायक राणे, नगरसेवक राकेश कांदे, संतोष वालावलकर आदी  उपस्थित होते. 'मेडिकल कॉलेजला 150 विद्यार्थी प्रवेशाची परवानगी देण्यात आली आहे. प्रवेश घेण्याची मुदत 15 जानेवारी रोजी संपली असून, प्रवेश पहिल्याच फेरीतच पूर्ण झाले आहेत. परवानगीअभीवी 225 विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारावा लागला, अशी महिती खासदार नारायण राणे यांनी दिली.

केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याबद्दल सांगतना नारायण राणे म्हणाले, “ दुपारी 1 वाजून 50 मिनिटांनी अमित शहा मेडिकल कॉलेज येथे येणार आहेत. 2 वाजून 20 मिनिटांनी मेडिकल कॉलेजचे त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. अमित शहा उद्घटनस्थळी 1 तास थांबतील. कॉलेजच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार असून, यावेळी विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर जिल्ह्यातील भाजप नेत्यांकडून केंद्रीय मंत्री अमित शहांचे स्वागत केले जाईल. हा कार्यक्रम संपल्यावर ते हेलिकॉप्टरने गोव्याला रवाना होणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com