कोकण रेल्वे मार्गावर विद्युतीकरणाच्या कामादरम्यान 'युटिलिटी व्हेईकलला' आग

Utility vehicle caught fire during electrification work on Konkan railway line
Utility vehicle caught fire during electrification work on Konkan railway line

रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या (konkan railway route)  मार्गावर सुरु असलेले विद्युतीकरणाच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या युटिलिटी व्हेईकलला (utility vehicle coach) आज सकाळी 9.45 च्या सुमारास अचानक आग (Fire news) लागल्याने रेल्वे वाहतूक दोन तासासाठी ठप्प झाली होती. यामुळे रेल्वे गाड्या जवळच्या स्थानकात थांबवून ठेवण्यात आल्या.

कोकण रेल्वे मार्गावर सध्या विद्युतीकरणाचे काम वेगाने सुरु आहे. सध्या हे काम रत्नागिरी ते मडगांव पर्यंतचे सुरु असून, या कामाचे साहित्य नेणारी टॉवर वॅगन व्हॅनने नेण्यात येत असताना, आज सकाळी  झाराप नजीक त्यातून धूर येऊ लागला. तेथील कर्मचाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर जवळच्या अग्निशमन यंत्रणेला कळवण्यात आले. अग्निशमन विभागाच्या गाड्या त्वरीत घटनास्थळी पोहोत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते, काहीवेळातच ही आग आटोक्यात आली पण यामध्ये आतील सर्व साहित्य जळून गेले होते. ही आग कशी लागली याचे कारण समजू शकलेले नाही. याची चौकशी रेल्वे प्रशासन करणार असल्याचे समजते.

या आगीमुळे या मार्गावरून जाणाऱ्या रेल्वे गाड्या (kokan railway station) जवळच्या स्थानकात थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. यामध्ये तुतारी (tutari express) कुडाळला तर मांडवी झाराप येथे थांबवून ठेवली होती. आगची बातमी समजताच आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी गर्दी केली. आग लागलेला कोच बाजूला काढल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com