Influenza Vaccination: पावसाळ्यापूर्वी मुलांना फ्लूची लस द्या; कारण...

Influenza Vaccination
Influenza Vaccination

मुंबई: देशात महाराष्ट्र राज्याला कोरोना विषाणूच्या(Covid Pandemic in Maharashtra) साथीच्या सर्वात जास्त सामना करावा लागला. दरम्यान, पावसाळ्याच्या सुरवातीमुळे इन्फ्लूएन्झाचा(influenza) धोकाही वाढला आहे. अशा परिस्थितीत राज्य कोविड टास्कफोर्स आणि नव्याने स्थापन झालेल्या बाल रोग टास्क फोर्सने संयुक्तपणे प्रत्येक मुलाला लसी देण्याचे आवाहन केले आहे. रविवारी झालेल्या बैठकीत दोन्ही टास्कफोर्सच्या डॉक्टरांनी सीएम उद्धव ठाकरे यांना पावसाळ्यापूर्वी सर्व मुलांना इन्फ्लूएंझा लस देण्याची शिफारस केली आहे. डॉक्टर म्हणाले की, इन्फ्लूएन्झा लस या आजारापासून बचाव करण्यास मदत करेल, ज्यामुळे रुग्णालये आणि चाचणी केंद्रांमध्ये गर्दी कमी होईल, कारण कोरोना आणि फ्लूची सामान्य लक्षणे काहीसे समान आहेत. अशा परिस्थितीत लोक मुलांच्या आरोग्याबद्दल गोंधळात पडतात आणि रुग्णालये आणि चाचणी केंद्रांकडे वळतात.(Vaccinating children against the flu before monsoon Covid cases may be reduced )

इन्फ्लूएंझा तीन दिवस मुंबईत वॉक-इन लसीकरण चालवेल 
इन्फ्लूएंझा श्वसनमार्गाचा एक संसर्गजन्य आजार आहे, जो खोकला, सर्दी आणि सौम्य तापाने सुरू होतो. नाक, डोळे आणि तोंडातून आपल्या शरीरात इन्फ्लूएंझा विषाणू प्रवेश करतो. या व्यतिरिक्त, जर या विषाणूमुळे पीडित व्यक्ती खोकला आणि शिंकला असेल आणि दुसरा व्यक्ती संपर्कात आला तर हा विषाणू पसरू शकतो. देशात दोन प्रकारची इन्फ्लूएंझा लस आहे. इन्फ्लुएंझा ए आणि इन्फ्लूएंझा बी. एका शॉट लसीची किंमत  1500 ते 2000 रुपयांपर्यंत असणार आहे.

विनामूल्य देण्याचा विचार करू

कोविड टास्कफोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओकी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना सांगितले की, 'आमचा सल्ला आहे की, मुलांना इन्फ्लूएंझाच्या लस देण्यात याव्यात. ती महाग असल्याने बहुतांश मध्यमवर्गीय आणि उच्चवर्गीयांना परवडणार नाही. राज्य स्तरावर, आपण कमीतकमी पुढील सहा महिन्यात किंमत कमी करण्याचा किंवा प्रत्येक मुलास ती विनामूल्य देण्याचा विचार करू शकतो." त्याचबरोबर बालरोगचिकित्सक टास्कफोर्सचे प्रमुख डॉ सुहास प्रभू यांनी यावर सहमती दर्शविली. 

अधिक स्पष्टता हवी

"सरकार या सूचनांवर विचार करेल. मात्र या सल्ल्यामुळे कोविडचा सकारात्मक दर कमी होण्यास मदत होईल की नाही याविषयी आम्हाला अधिक स्पष्टता हवी आहे. टास्क फोर्सने या संदर्भातील परिस्थिती स्पष्ट करावी, असे मुख्यमंत्री ठाकरे यावर म्हणाले. 

इन्फ्लूएन्झाची लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय

  1.  इन्फ्लूएन्झा व्हायरसमुळे थकवा जाणवतो आणि शरीर अस्वस्थ राहू लागते. 
  2.  अशक्तपणा येतो. जर तुम्ही काही काम केले तर तुम्हाला चक्कर येवू शकतो.
  3.  तीव्र ताप आणि थंडी लागणे. घशात कफ जमा होणे. खाण्यात, पिण्यास आणि गिळण्यात अडचण येते. श्वास घेण्यास त्रास होणे. 
  4.  पीडित व्यक्तीच्या डोक्यातही वेदना होतात. हा विषाणू शरीरीात पसरल्यावर त्वचा निळी पडू शकते
  5.  इन्फ्लूएन्झा व्हायरस रोखण्यासाठी स्वच्छता सर्वात महत्वाची आहे. म्हणून, आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा, तसेच जेवणी आधी आणि नंतर आपले हात स्वच्छ धुवा. 
  6.  शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढवणारे पदार्थ खा. विशेषत: शिळे अन्न खावू लका.
  7.  इन्फ्लूएन्झा झाल्यास शरीरात पाण्याची कमतरता जाणवते, त्यामुळे भरपूर द्रव पदार्थ खा, ताक, दूध, लस्सी, पाणी आणि फळांचे रस प्या. 
  8.  छातीवर विक्स किंवा बाम लावा आणि थंड हवा घेवू नका. आपल्याला श्वास घेण्यास त्रास होत असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com