तळीरामांसाठी महत्त्वाची बातमी! 'नो व्हॅक्सीनेशन नो अल्कोहोल'

दारूची दुकाने, वाईन/बीअर शॉपी, देशी दारूची दुकाने, FL3 धारक दारू विक्रीची ठिकाणे या ठिकाणी काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे.
तळीरामांसाठी महत्त्वाची बातमी! 'नो व्हॅक्सीनेशन नो अल्कोहोल'
Vaccination is not done then alcohol will not be available Big decision of Aurangabad collectorDainik Gomantak

कोरोनाव्हायरस लसीकरण (Covid Vaccination) मोहिमेला गती देण्यासाठी देशातील विविध भागात वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब केला जात आहे. जागरूकता वाढवण्यासाठी महाराष्ट्राचा आरोग्य विभाग सलमान खानसारख्या बड्या स्टार्सकडून लसीकरण करण्याचे आवाहन करत आहे. अनेक ठिकाणी कडक नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. औरंगाबादचे जिल्हा दंडाधिकारी सुनील चव्हाण यांनी लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी एका 'हट के' मार्गाची निवड केली आहे. त्यांनी आपल्या जिल्ह्यात ' नो लस, नो दारू' असा (No vaccine, no alcohol in Aurangabad) आदेश दिला आहे. म्हणजेच ज्या मद्यपींनी लस घेतली नाही, त्यांना आजपासून दारू मिळणार नाही. लसीकरण केले नाही तर पेट्रोल, डिझेलही मिळणार नाही.

जिल्हादंडाधिकारी चव्हाण यांनी दिलेल्या आदेशानुसार दारूची दुकाने, वाईन/बीअर शॉपी, देशी दारूची दुकाने, FL3 धारक दारू विक्रीची ठिकाणे या ठिकाणी काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. म्हणजेच त्यांनी लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे. याशिवाय ग्राहकांसाठीही याबाबत कठोर नियम आहेत. ज्या ग्राहकांनी लसीचा किमान एक डोस घेतला आहे अशा ग्राहकांनाच मद्य विकले जाणार, अन्यथा त्यांना घरी परत केले जाईल.

Vaccination is not done then alcohol will not be available Big decision of Aurangabad collector
एस टी कर्मचारी आक्रमक; परिवहन मंत्र्यांच्या घरावर फेकली शाई

याशिवाय आजपासून हॉटेल, रेस्टॉरंट, भोजनालय, ढाबे आणि इतर खाद्यपदार्थ सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही लसीकरण पूर्ण करण्याची अट घालण्यात आली आहे. एवढेच नाही तर ज्यांचे लसीकरण झालेले नाही ते पेट्रोल आणि डिझेलही घेऊ शकणार नाहीत. यामुळे लसीकरण मोहिमेला गती मिळेल, असा दावा जिल्हा दंडाधिकारी सुनील चव्हाण यांनी केला आहे.

महाराष्ट्रातील लसीकरणाची सद्यस्थिती

सर्वात जलद लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेशात आतापर्यंत सुमारे 15 कोटी 9 लाख लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. तर आतापर्यंत महाराष्ट्रात सुमारे 10.81 कोटी लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. दररोज जास्तीत जास्त लसीकरणाच्या सरासरीच्या बाबतीत उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘हर घर दस्तक’ कार्यक्रमांतर्गत आता लसीकरण मोहीम अधिक तीव्र करण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून केले जात आहेत.

Vaccination is not done then alcohol will not be available Big decision of Aurangabad collector
'तुम्हाला लाज नाही वाटत?', ओवेसींचा बाबरी मशिदीवरून महाविकासआघाडी सरकारवर हल्लाबोल

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आता 11 ते 18 वयोगटातील मुलांना पहिला डोस आणि ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर डोस जलद गतीने देण्याची गरज व्यक्त केली आहे. कारण शाळा सुरू झाल्यानंतर 21 दिवसांतच 1100 हून अधिक मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे, कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने आरोग्य विभागावरील ताण थोडा कमी झाला आहे. त्यामुळे लसीकरण मोहिमेच्या कार्यक्रमात आरोग्य विभागाशी निगडीत कर्मचारी व अधिकाऱ्यांची मदत घेऊन लसीकरण मोहिमेला गती देता येईल.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com