नितेश राणेंच्या गंभीर आरोपांना वरुण देसाई यांचे जोरदार प्रत्युत्तर 

दैनिक गोमन्तक
सोमवार, 15 मार्च 2021

नितेश राणे यांनी आज राज्यातील आघाडी सरकारवर टीका करताना सचिन वाझे प्रकरणाशी संबंधित गंभीर आरोप केले होते.

नितेश राणे यांनी आज राज्यातील आघाडी सरकारवर टीका करताना सचिन वाझे प्रकरणाशी संबंधित गंभीर आरोप केले होते. आयपीएल सामन्यांवर लावल्या जाणाऱ्या सट्टेबाजारातुन सचिन वाझे बुकींना फोन करून पैसे जमा करतात. व यातून मिळालेला वाटा घेण्याचे काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नातेवाई असलेले वरून सरदेसाई हे करत असल्याचा आरोप नितीश राणे यांनी केला होता. त्यानंतर वरून सरदेसाई यांनी नितेश राणे यांच्याकडून करण्यात आलेल्या आरोपांचा समाचार घेताना त्यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत.     

सचिन वाझे यांना दोन आठवड्यांची एनआयए कोठडी  
  
माझ्यावर केलेले आरोप अत्यंत खोटे असून, ज्यांनी माझ्यावर घाणेरडे आरोप केलेत त्यांची पार्श्वभूमी सर्वांनाच माहिती असल्याचे वरून सरदेसाई यांनी आज पत्रकार परिषद घेत म्हटले आहे. माझे राजकीय आयुष्य उध्वस्त करण्यासाठी हे प्रयत्न सुरु असून, नितेश राणे यांनी माझ्यावर केलेले आरोप पुराव्यानिशी सिद्ध करावेत, अन्यथा मी त्यांच्यावर मानहानीचा दावा करणार", असे वरुण देसाई यांनी यावेळी सांगितले. राणे कुटुंबियांना राज्यात कोणी गांभीर्यानं घेत नाही असेही वरून देसाई पुढे म्हणाले. 

कोण आहेत वरून सरदेसाई ?
वरुण  देसाई हे युवा सेनेचे सचिव, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरेंच्या बहिणेचा मुलगा असून वनमंत्री आदित्य ठाकरे यांचे ते मावस भाऊ आहेत. विशेष म्हणजे आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवावी असे मत त्यांनी यापूर्वी व्यक्त केले होते. त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगच शिक्षण पूर्ण केले असून, शिवसेनेच्या सोशल मीडिया कॅम्पेनिंगची धुरा ते संभाळत असल्याचे बोलल जाते.

संबंधित बातम्या