फास्टॅग प्रणालीवर वाहनधारकांना मिळणार आता 5 टक्के कॅशबॅक

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 8 जानेवारी 2021

'महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पुणे- मुंबई प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना नवीन वर्षाची मोठी भेट देण्याचा निर्णय घेतला आहे .

मुंबई :  'महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पुणे- मुंबई प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना नवीन वर्षाची मोठी भेट देण्याचा निर्णय घेतला आहे .वाहनधारकांनी फास्टॅग प्रणालीचा जास्तीत जास्त वापर करावा यासाठी येत्या 11 जानेवारीपासूनफास्टॅग प्रणालीवर 5% सवलत देण्यात येणार आहे.

त्याचबरोबर वांद्रे- वरळी प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना ही या सुविधेचा लाभ मिळणार आहे.
प्रत्येक प्रवासाच्या फेरीला पथकराच्या 5% रक्कम वाहनाधारकाच्या बॅंक खात्यात जमा होणार आहे फास्टॅगचा वापर वाढावा यासाठी महामंडळाने कार, जीप एसयूव्ही वाहनाधारकांकरीता मर्यादित कालावधीसाठी सवलत लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.असं व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांनी सांगितले.फास्टॅग वाहनधारकांच्या संख्येत वाढ होण्यासाठी पुणे -मुंबई प्रवास करणाऱ्या मार्गावरील खालापूर,तळेगाव पथकर नाक्यावर तसेच पेट्रोल पंपावर वेगवेगळ्या बॅंकांच्या च्या मदतीनं फास्टॅग केंद्रे विकसीत केली आहेत.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने राज्यातील पथकर नाक्यावर Fastag प्रणाली विकसीत करण्यासाठी आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 'महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 

अधिक वाचा :

कोकण पर्यटन अजूनही कोरोनाच्या छत्रछायेखाली

महाराष्ट्रात बळीराजाला सुगीचे दिवस कधी येणार?.. गेल्या ११ महिन्यात २,२७० शेतकऱ्यांच्या आत्महत्या

 

संबंधित बातम्या