जेष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

कोरोनाची लागण झाल्यामुळे आशालता यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. सोमवारी अचानक त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात होतं.

सातारा: मराठी सुप्रसिद्ध अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं आज पहाटे कोरोनाच्या संसर्गामुळे निधन झालं आहे. 'आई माझी काळूबाई' या मालिकेतील 27 जणांना कोरोनाची लागण झाली. यामध्ये आशालता या देखील मुख्य भूमिकेत होत्या. पण, यादरम्यान 27 जणांना कोरोनाची लागण झाली. कोरोनाची लागण झाल्यामुळे आशालता यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. सोमवारी अचानक त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात होतं. पण आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणारे अति दक्षता विभाग तज्ज्ञ डॉ. संजय साठे आणि हृदय विकार तज्ज्ञ डॉ. सोमनाथ साबळे यांनी दिली. गेले 5 दिवस आणि मृत्यूसमयी प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल या त्यांच्या सोबत होत्या.

अधिक माहितीनुसार, मुंबईतील एक डान्स ग्रुप चित्रीकरणासाठी गेला होता. तेव्हा कोरोनाचा फैलाव झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. साताऱ्यातील हिंगणगाव (ता. फलटण) या गावी हे चित्रीकरण सुरू होतं. सुरुवातील इथल्या गावकऱ्यांनी चित्रीकरणासाठी नकार दिला होता. राज्य सरकारने कोरोनामध्ये चित्रीकरणाची परवानगी दिली असली तरी नियमांचे काटेकोर पालन करण्याचे सांगितले आहे. शूटिंगदरम्यान तेथील सेट वारंवार सॅनिटाइझर करण्याबरोबर कलाकारांनी मास्क लावणे बंधनकारक आहे.

काळुबाईच्या नावाने चांगभलं या मालिकेच्या निर्मात्या अलका कुबल आहेत. कोरोनाच्या काळात शुटींगला परवानगी देण्यात आली असली तरी यादरम्यान नियमांचं पालन देखील महत्वाचं आहे. सेटवर नियमांचं पालन करत काळजी घेतली जात असताना देखील एवढ्या जणांना कोरोनाची बाधा कशी झाली यावर आता प्रश्नचिन्ह उभं राहिलंय.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या