कृष्णा नदी पात्रात सापडला किल्याप मासा: पाहा व्हिडिओ

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 9 जून 2021

कृष्णा नदीच्या पाणी पातळीत ही वाढ झाली आहे. तर नदी मध्ये मासेमारी करण्यासाठी लगबगही सुरू झाली आहे. यातच सांगलीच्या कृष्णा नदीच्या पात्रात चिलापी जातीचा मासा सापडला आहे. 

सांगली: महाराष्ट्रात मान्सुनने दमदार एंट्री केली आहे. त्यातच सांगली जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी चांगला पाऊस जिल्ह्यात झाला. आणि पावसाळा ही सुरू झाला आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत ही वाढ झाली आहे. तर नदी मध्ये मासेमारी करण्यासाठी लगबगही सुरू झाली आहे. यातच सांगलीच्या कृष्णा नदीच्या पात्रात चिलापी जातीचा मासा सापडला आहे. यालाच गावठी भाषेत या माश्यास किल्याप असे म्हणतात.(Chilapi fish has been found in the Krishna river basin of Sangli)

हा मासा ज्या मच्छिमाराने पकडला त्याने या माशाला हातात धरून सगळ्यांना दाखवला तेव्हा खरच तो चिलापी जातीचा मासा असल्याचे सिद्ध झाले. सध्या कृष्णा नदीचे पात्र भरले असल्याने या नदिच्या पात्रात मासेमारी ला वेग आला आहे.

मॉन्सूनची चाहूल लागताच कोकणात रंगीबेरंगी निसर्गदूतांचे आगमन

दरम्यान गोवा राज्यात 1 जूनपासून दोन महिन्यासाठी मासेमारी बंदी काळ सुरू झाला आहे. ट्रॉलर्समधून माशांची जाळी काढण्याचे तसेच होड्या किनाऱ्यावर आणण्याचे कामही महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात झाले आहे. मच्छिमार खात्याने मासेमारी धक्केही या बंदी काळात सील करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या धक्क्यावरील डिझेल पंपना सील ठोकले जाणार असल्याची माहिती मच्छिमार खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली. दरवर्षी 1 जून ते 31 जुलै हा गोव्यासाठी मासेमारी बंदी काळ असतो. त्यामुळे राज्यातील सर्व ट्रॉलर्स तसेच मोटारबोटींना मच्छिमारीला बंदी असते. या कोविड काळात गोव्यातील मच्छिमारीच्या व्यवसायावरही परिणाम होतो. ट्रॉलर्सचे कर्मचारी या बंदी काळात आपापल्या मूळ गावी जातात मात्र कोविडमुळे यावर्षी अनेकजण अडकले आहेत. 

बारामतीच्या चहावाल्याची मोदींना दाढी करण्यासाठी 100 रुपयांची मनीऑर्डर

सालाबादप्रमाणे 1 जूनपासून गोवा राज्यातील मासेमारी बंद झाली आहे. तब्बल 61 दिवस ही मासेमारी बंद राहणार आहे. त्यातच कोरोना च्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परराज्यातून होणारी चिकनच्या कोंबड्या आणि माश्यांची आयात रखडली आहे. परीणामी, राज्यातील नागरिकांना पुढील दोन महिने ताज्या मासळीविना काढावे लागणार असून, सुकी मासळीचे दर वाढण्याची शक्यता आहे. 

संबंधित बातम्या