video: जीवावर उदार व्हावं पण किती? चालत्या ट्रेनमध्ये दिव्यांगाचा चढत होता अन् ...

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 6 फेब्रुवारी 2021

 या व्हिडिओमध्ये एक दिव्यांग माणूस चालत्या  ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करीत आहे. हा व्हिडिओ पाहून प्रत्येकजण आश्चर्यचकित होईल कारण दिव्यांग असूनही त्या व्यक्तीने आपल्या जीवाची पर्वा न करता असे कृत्य केले.

पनवेल:  बरेचदा उशीर झाल्यामुळे लोक चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करतात. चालणार्‍या ट्रेनमध्ये चढणे किती धोकादायक असू शकते याकडे बरेचदा लोक दुर्लक्ष करतात. धावत्या ट्रेन मध्ये चढू किंवा उतरू नका अशा सुचना दिल्या असल्या तरी लोकांना ट्रेनमध्ये चढायची फारच  घाई असचे. याच दरम्यान अशीच एक घटना घडली ज्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक दिव्यांग माणूस चालत्या  ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करीत आहे. हा व्हिडिओ पाहून प्रत्येकजण आश्चर्यचकित होईल कारण दिव्यांग असूनही त्या व्यक्तीने आपल्या जीवाची पर्वा न करता असे कृत्य केले आहे. 

ही घटना महाराष्ट्रातील पनवेल स्थानकावरची आहे, जिथे एक मोठा अपघात होता होता टळला.  रेल्वे संरक्षण दलाच्या (आरपीएफ) जवानाने अपंग व्यक्तीला चालत्या ट्रेनमध्ये चढण्यापासून रोखले नाहीतर आज त्या व्यक्तीला आपला जीव गमावावा लागला असता. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. काल  शुक्रवारी दुपारी पावणे चारच्या सुमारास पनवेल स्थानकावर हा दिव्यांग व्यक्ती चालत्या ट्रेन मध्ये चढण्याचा प्रयत्न करू लागला आणि घसरला. या प्रकरणात स्टेशनवर तैनात असलेल्या आरपीएफच्या जवानाने सतर्कता दाखवत दिव्यांगचा हात धरला आणि त्याला खाली खेचले. आरपीएफ जवानने त्याला चांगलाच समज दिला, आणि भविष्यात कधीही अशी चूक होऊ नका, चालणार्‍या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करू नका. असा सल्लाही दिला.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे वाशी कोर्टात होणार हजर -

व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की ट्रेन वेगात जात आहे आणि हा अपंग व्यक्ती ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करीत आहे. पुढे जात असताना अचानक त्या व्यक्तीचा हात घसरला, आणि त्यानंतर आरपीएफ जवानाने  त्याचा हात पकडत त्याला खाली ओढले. आणि तो फूटपाथवर पडल्याचे या व्हिडिओ दिसत आहे.  हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या सर्वांनी त्यातून एक धडा घेतला पाहिजे की उशीर झाला असला तरी, चालत्या ट्रेनमध्ये चढून आपला जीव धोक्यात घालण्याचा प्रयत्न करू नये.

संबंधित बातम्या