video: स्त्री शक्ती ला प्रेरीत करणार अमृता फडणवीस यांचं हे नविन गाणं

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 6 मार्च 2021

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे एक नवीन गाणे प्रसिद्ध होणार आहे. या गाण्याचे बोल “कुणी म्हणाले वेडी” असे आहेत.

मुंबई: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे एक नवीन गाणे प्रसिद्ध होणार आहे. या गाण्याचे बोल “कुणी म्हणाले वेडी” असे आहेत. अमृता फडणवीस यांनी या गाण्यात आपली न घाबरता, न डगमगता परफॉर्मन्स दिला आहे. अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या गाण्याविषयी माहिती दिली आहे. त्यांच्या या मराठमोळ्या अंदाजाचे कौतुक करणाऱ्यांमध्ये राजकारणी, अभिनेते, महाराष्ट्रातील लोक मोठ्या प्रमाणात पुढे आले आहेत. अमृता फडणवीस हया महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आहेत. त्यांचे हे नवे गाणे मराठमोळ्या अंदाजात त्यांनी स्वत: गायले आणि सादर केले आहे. हे गीत 8 मार्च म्हणजेच महिला दिनाच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे.

West Bengal Assembly election 2021: पश्चिम बंगालच्या वाघीणीला शिवसेनेचा पाठींबा

जेव्हा स्त्री संघर्षासाठी बाहेर पडली तेव्हा तीला कुणी वेडी, कुणी खुळी असे म्हटले. पण तीने न डगमडता जगाला दिखवून दिले की, ती खंबीर आहे, सक्षम आहे. तीच्या प्रगतीचा प्रवाह थांबविणे या जगाला शक्य नाही. अशा काहीश्या आशयाचे हे गाणे समस्त स्त्री वर्गाला प्रेरीत करणारे असणार आहे.

ट्रोलर्सना दिला इशारा

“जेव्हा ती संघर्षपथावर निघाली तेव्हा तिल- कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी.. तिने मात्र जगाला दाखवून दिले की तिच्या प्रगतिचा प्रवाह रोखणे शक्य नाही ! ‘स्त्री शक्ती‘ला गौरवान्वित करणारे माझे नवीन गीत नक्की पाहा, ८ मार्च रोजी, जागतिक महिला दिनी !” असे ट्विट अमृता फडणवीस यांनी  केले आहे. आणि सोबतच ट्रोलर्सना तयार रहा असा खोचक इशाराही दिला आहे.

Big Breaking : अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या कारच्या मालकाचा संशयास्पद मृत्यू

तिने बिग बीबरोबरही काम केले आहे

यापूर्वीही अमृता फडणवीस यांनी बरीच गाणी गायली आहेत. बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासमवेत त्यांनी एक अल्बम देखील रीलीज केला आहे.'नयन डरे-डरे 'गाण्यापूर्वी त्यांनी आपल्या ट्विटर आणि यूट्यूब वाहिनीवर एक इंग्रजी गाणेही प्रसिद्ध केले. प्रसिद्ध इंग्रजी गायक लिओनेल रिची यांचे हे मूळ गाणे आहे. या गाण्यात लिओनेल संगीत शिक्षकाची भूमिका साकारत आहे. गाण्यात तो एका अंध मुलीच्या प्रेमात पडलेला दिसून आला आहे. अमृता फडणवीस यांनी हेच गाणे गायले असून सोशल मिडियावर पोस्ट केले आहे.

 

संबंधित बातम्या