तुम्ही मून वॉक, कॅट वॉक बघितला आता कॉक वॉकही बघा व्हिडिओ व्हायरल

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 31 मार्च 2021

मुंबईत मास्क न घातल्यामुळे मुंबई पोलिसांनी लोकांना शिक्षा केली. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ट्विटर युजरने सांगतिले आहे की मुंबईत मास्क न घातल्यास कोंबडा बनविला जाईल.

मुंबई: महाराष्ट्रात कोरोनाची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. मुंबई, पुणे यासारख्या शहरांमध्ये कोरोनाचे वाढते प्रकार वाढल्याने निर्बंधही कडक करण्यात आले आहेत. दरम्यान, मुंबईत मास्क न घातल्यामुळे मुंबई पोलिसांनी लोकांना शिक्षा केली. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ट्विटर युजरने सांगतिले आहे की मुंबईत मास्क न घातल्यास कोंबडा बनविला जाईल.

मुंबई पोलिसांनी मंगळवारी दक्षिण मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथे समुद्रात जाण्याचा प्रयत्न करण्याऱ्या कमीतकमी पाच जणांना शिक्षा देण्यात आली आणि "कॉक वॉक" करायला लावले. एका अधिकाऱ्याने सांगितले की ही घटना सोमवारी दुपारी समुद्र किनाऱ्यावर घडली, जिथे काही पुरुषांच्या एका गटाने पाण्यात घुसण्याचा प्रयत्न केला होता.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे रुग्णालयात दाखल 

समुद्रकिनार ड्यूटीवर असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या पथकाने त्यांना शिक्षा म्हणून कॉक वॉक करण्यास सांगितले. आता, या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे मास्क घातल्यास कारावा लागणार कॉक वॉक अशा कमेंट आता सोशल मीडियावर केल्या जात आहे.

ट्विटरवर या व्हिडिओला उत्तर देताना मुंबई पोलिसांनी आपल्या अधिकृत हँडलद्वारे म्हटले आहे की, "प्रत्येक उल्लंघनावर कारवाई करण्याची कायदेशीर तरतूद आहे आणि ती फक्त दंडात्मक कारवाई आहे."

संबंधित बातम्या