परमबीर सिंह भ्रष्टाचाराने बरबटलेले; विनायक राऊत यांचे गंभीर आरोप

दैनिक गोमंतक
सोमवार, 22 मार्च 2021

मनसुख हिरेन प्रकरणात मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून बदली केल्या नंतर परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

मनसुख हिरेन प्रकरणात मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून बदली केल्या नंतर परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांमुळे सध्या राज्यातील महाविकास आघाडी सरकार  अडचणीत आल्याचे दिसते आहे. महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते पत्रकार परिषदा घेऊन या प्रकरणाबद्दलचे स्पष्टीकरण देताना दिसत आहेत. त्यातच आता शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन परमबीर सिंह यांच्यावर आरोप केले आहेत. परमबीर सिंह हे स्वतःच भ्रष्टाचारात बरबटलेले आहे, असा गंभीर आरोप विनायक राऊत यांनी केलं आहे. (Vinayak Raut said that Parambir Singh is corrupted)

अतिसंवेदनशील हिरेन प्रकरण उलगडले; तपास अधिकाऱ्याची फेसबुक पोस्ट

सचिन वाझे यांच्याकडून महिन्याला 100 कोटी वसूल करून देण्याची मागणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली असल्याचा आरोप परमबीर सिंह यांनी केला होता. या आरोपानंतर विरोधीपक्षांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यातच आता शिवसेनेचे नेते विनायक राऊत (Vianayak Raut) यांनी देखील पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत विनायक राऊत यांनी परमबीर सिंह हे भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत असा गंभीर आरोप केला. परमबीर सिंह हे केंद्राचे बोलके पोपट असून त्यांच्यावर गुन्हादाखल सुद्धा आहे, असेही ते पुढे म्हणाले. तर, परमबीर सिंह यांनी सुद्धा या प्रकरणी आता सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. 

परमबीर सिंह यांच्या पत्रावर शरद पवार यांनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपानंतर आज लोकसभेत सुद्धा या प्रकरणामुळे गदारोळ झाला. अपक्ष खासदार नवनीत राणा तसेच भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी राज्यसरकार आरोप करत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आह. गृहमंत्री खंडणी मागायला लागलेत, सरकार भ्रष्ट झाले आहे, कायदा सुव्यवस्था ढासळली असल्याने महाराष्ट्रात लवकरात लवकर राष्ट्रपती राजवट लागू करा, असे खासदार गिरीश बापट संसदेत म्हणाले. तर सचिन वाझे यांच्यासारख्या अधिकाऱ्याला सेवेत का रुजू केले असा प्रश्न नवनीत कौर राणा(Navnit kaur Rana) यांनी संसदेत उपस्थित केला.   
 

संबंधित बातम्या