Virar Hospital Fire: विजय वल्लभ रुग्णालयातील आग दुर्घटनेत 13 रुग्णांचा मृत्यू; आठवडाभरात तिसरी घटना

गोमंन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

महाराष्ट्रातील विरार पश्चिम इथल्या विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात मध्यरात्री 3 वाजताच्या सुमारास आग लागली असून या दुर्घटनेत 13 रुग्णांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

मुंबई: महाराष्ट्रातील विरार पश्चिम इथल्या विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात मध्यरात्री 3 वाजताच्या सुमारास आग लागली असून या दुर्घटनेत 13 रुग्णांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. रुग्णालयातील 17 रुग्ण या आगीच्या कचाट्यात सापडले होते. अग्निशमन दलाने आणि पोलिसांनी या आगीवर नियंत्रण मिळवले आहे. या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेवर तीव्र शोक व्यक्त केला असून उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांना त्रास होवू नये त्य़ाचबरोबर त्यांची लगेचच इतरत्र ठीकाणी व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. या दुर्घटनेची माहीती मिळताच मुख्यमंत्र्यांनी स्वतः संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्यांशी घटनेची चौकशी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्वप्रथम आग पूर्णपणे विझवून इतर रुग्णांवरील उपचार सुरू राहतील याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे.
या दुर्घटनेचे मुख्य कारण शोधण्यासाठी योग्य तो तपास करावा. घटनास्थळी अग्निसुरक्षेची याग्य ती काळजी घेतली होती किंवा नाही हे पाहून तातडीने योग्य तो तपास करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

जनतेसाठी मुख्यमंत्री असतो; पर्रीकरांचा फोटो शेअर करत उध्दव ठाकरेंना टोला 

विजय वल्लभ रुग्णालय चार मजली आहे या रूग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. या दुर्घटनेच्यावेळी अतिदक्षता विभागात एकून 17 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यापैकी 13 कोविड रुग्ण या दुर्घटनेत दगावले आहे. तर 5 रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर असलेलेल्या अतिदक्षता विभागात रात्री 3 वाजल्याच्या सुमारास ही आग लागली होती. या घटनेत अतिदक्षता विभागातील 13 रुग्णांचा मृत्यू झाला अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुळसळ यांनी दिली. घटनास्थळी विरार अग्निशमन दलाचे 3 फायर वाहन उपस्थित होते. ही आग विझविण्याचा अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीने प्रयत्न केला. आणि पहाटे 05.20 वा. सुमारास आग विझवण्यात त्यांना यश आले.

आगीत मृत्यू झालेल्यांची नावे खालीलप्रमाणे

उमा सुरेश कनगुटकर- वय 63 वर्षे

निलेश भोईर- वय 35 वर्षे

पुखराज वल्लभदास वैष्णव- वय 68 वर्षे

रजनी आर कडू- वय 60 वर्षे

नरेंद्र शंकर शिंदे- वय 58 वर्षे

कुमार किशोर दोशी- वय 45 वर्षे

जनार्दन मोरेश्वर म्हात्रे- वय 63 वर्षे

रमेश टी उपायान- वय 55 वर्षे

प्रवीण शिवलाल गौडा- वय 65 वर्षे

अमेय राजेश राऊत- वय 23 वर्षे

शमा अरुण म्हात्रे- वय 48 वर्षे

सुवर्णा एस पितळे- वय 64वर्षे

सुप्रिया देशमुख- वय 43वर्षे

संबंधित बातम्या