बॉम्बे नको, महाराष्ट्र हायकोर्ट हवे

Dainik Gomantak
सोमवार, 1 जून 2020

सर्वोच्च न्यायालयात याचिका

मुंबई

, ता. 31 : मुंबई उच्च न्यायालयाचे हायकोर्ट ऑफ बॉम्बे हे नाव बदलून हायकोर्ट औफ महाराष्ट्र असे ठेवावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका माजी न्यायाधिशांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे.
कामगार न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश म्हणून सेवानिवृत्त झालेल्या व्ही. पी. पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे. पाटील सुमारे 26 वर्षे न्यायाधीश पदावर होते. महाराष्ट्र या शब्दात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक मूल्यांचे महत्त्व अधोरेखित होते. महाराष्ट्राचा प्राचीन वारसा याद्वारे जतन केला जातो, त्यामुळे राज्य घटनेच्या अनुच्छेद 19, 21 आणि 29 नुसार महाराष्ट्र हे नाव उच्च न्यायालयाला योग्य आहे, असा दावा याचिकेत केला आहे. शिवाय राज्याच्या नावाला साधर्म्य असलेले नाव असेल तर नागरिकांना संभ्रमही वाटणार नाही, असा दावा याचिकेत केला आहे.
उच्च न्यायालयांच्या नावात सुधारणा करणारे विधेयक केंद्र सरकारने सन 2016 मध्ये मंजूर केले आहे. त्यानुसार कलकत्ताचे कोलकाता आणि मद्रासचे चेन्नई करण्यात आले आहे, असाही दाखला याचिकेत दिला आहे. राज्याच्या नावाप्रमाणेच उच्च न्यायालयाचे नाव असणे हा स्वायत्त अधिकार आहे, त्यामध्ये बदल होऊ शकत नाही, असा दावा केला आहे.

वारसा सन्मानाचा
महाराष्ट्रातील नागरिकांची ही मागणी मागील कित्येक वर्षांपासून आहे, त्यामुळे कायद्यानुसार यावर कार्यवाही करावी, अशी मागणी याचिकेत केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाला दीडशे वर्षांचा ऐतिहासिक आणि सन्मानाचा वारसा आहे.

संबंधित बातम्या