जिव्हारी खेळ! पाणी टंचाईमुळे महिलांनी गाठले माहेर

नाशिकच्या दांडीची बारी गावात लग्नानंतर मुली सासर सोडून जाण्याच्या ह्या प्रकाराची दखल राष्ट्रीय मावाधिकार आयोगाने घेतली.
Water Crisis
Water CrisisDainik Gomantak

नाशिकच्या (Nashik) दांडीची बारी गावात लग्नानंतर मुली सासर सोडून जाण्याच्या ह्या प्रकाराची दखल राष्ट्रीय मावाधिकार आयोगाने घेतली. पाण्याची भीषण टंचाई असलेल्या या गावात अनेक किलोमीटर पायी वणवण करावी लागत आहे. महिलांना पायपीट करून डोक्यावरून पाण्याचे हंडे आणावे लागत असल्याने लग्न झालेल्या मुली सासर सोडून जाण्याचे प्रकार जास्त प्रखरपणे घडत आहेत. याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर मानवाधिकार आयोगाने सुमोटो दाखल करून या प्रकरणात लक्ष घातलं आहे. (Water crisis forcing women to leave their in laws house in Nasik village NHRC takes cognizance)

Water Crisis
सांगलीत टेम्पो आणि कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

प्रत्येक उन्हाळ्यात दांडीची बारी गावात पाण्यासाठी महिलांना वणवण फिरावं लागतं. महिलांना लांब अंतरावरून पाणी भरावे लागते. मार्च ते जून महिन्यात जवळपासच्या विहिरींमध्ये पाण्याची पातळी खाली जमिणीला जाऊन टेकली आहे. पाण्याची भांडी भरण्यासाठी बराच काळ ताटकळत बसावे लागत. गावच्या पाण्याच्या समस्येमुळे आई-वडिलसुद्धा आपली मुलगी या गावातल्या मुलाला देण्यास धजावत नाहीत असं मानवाधिका आयोगाच्या मंडळाने यावेळी म्हटले आहे. मानवाधिकार आयोगाने याठिकाणी मुलभूत मानवाधिकारांचे उल्लंघन होत असल्याचं देखील म्हटलं आहे.

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेत याप्रकरणी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना आणि केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या सचिवांना नोटीस देखील पाठवली आहे. याप्रकरणी सहा आठवड्याच्या आतमध्ये अहवाल सादर करण्याचे आदेश मानवाधिकार आयोगाने दिले आहेत. परिसरातील सध्याची पिण्याच्या पाण्याची स्थिती आणि या समस्येचं निराकारण करण्यासाठी कोणती पावले उचलली जात आहेत याची देखील माहिती आयोगाने मागवली आहे.

Water Crisis
मुंबईत 26 मशिदीतील मुस्लिम धर्मगुरूंचा मोठा निर्णय, लाऊडस्पीकरशिवाय होणार सकाळची अजान

नाशिकपासून 90 किमी अंतरावर सुरगाना तालुका आहे, या तालुक्यातील 300 लोकवस्तीचं दांडीची बारी हे गाव आजही पाण्याच्या संकटाचा सामना करताना दिसत आहे. गावात पाण्याच्या समस्येमुळे मुलांना लग्नसाठी कोणीच मुली देत नाहीये. त्यातही लग्न झालंच तर काही दिवसातच मुली सासर सोडून पळून जातात. हंडाभर पाण्यासाठी अनेक किलोमीटरची पायपीट करताना महिलांना इतर संकटांनाही तोंड द्यावं लागतं आहे.

महिलांना उन्हाळ्याच्या दिवसात भर उन्हात डोंगराच्या पाय़थ्याला असलेल्या ओढ्यातून पाणी आणयला जावं लागतं. यासाठी खडकाळ भाग तुडवत पायी गेल्यानंतर पाणी भरण्यासाठी बराच वेळ वाट बघावी लागते, इतर महिलासुद्धा पाण्यासाठी आल्या असल्यानं नंबर येईपर्यंत थांबून पाणी भरायचं आणि घरची वाट धरायची. एक कळशी भरायला ती तास लागतात. अशी दोन भांडी महिला पाण्यासाठी घेऊन गेलेल्या असतात. दिवसातून दोन वेळा पाणी आणावं लागत असल्यानं अख्खा दिवस पाण्यामध्येच जातो. रात्रीच्या अंधारात कधी कधी घरी यावं लागतं, तेव्हा जंगलातून येताना वन्य प्राण्यांचा धोकाही उद्भवू शकतो.

एका तरुणाने काही दिवसांपूर्वी 2014 मध्ये घडलेली घटना सांगितली होती, एका मुलाचं लग्न झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुलगी तिच्या माहेरी गेली. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी तिला पाणी आणायला इतर महिलांसोबत जावं लागलं होतं. एका डोंगराच्या पायथ्याशी गेल्यानंतर हे खूपच कठीण असल्याचं तिला समजलं आणि तेव्हा पाण्यासाठी घेऊन गेलेली भांडी तिथेच ठेवून मुलीने थेट माहेर गाठले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com