मुंबईकरांना मिळणार दिलासा; 12 नवीन मार्गांवर वॉटर टॅक्सी सेवा होणार सुरू

गोमंन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 8 एप्रिल 2021

मुंबईच्या गर्दीच्या रस्त्यांवरील वाहतुकीचा ओढा कमी करण्यासाठी १२ नवीन मार्गांवर वॉटर टॅक्सी सेवा सुरू केली जाणार आहे. त्याचबरोबर 4 नवीन मार्गांवर रोल ऑन रोल ऑफ सर्व्हिस सुरू केली जाईल.

मुंबई: दिल्ली मुंबईसारख्या महानगरांमध्ये ट्रॅफिक जाम ही मोठी समस्या आहे. विशेषत: मुंबईत जाममुळे दररोज लाखो लोक अडचणीत सापडतात. समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या या शहरात लोक रस्त्यांव्यतिरिक्त मेट्रो आणि लोकल ट्रेनचा वापर करतात. पण येत्या काळात त्यांची ही ओढाताण आणखी कमी होणार आहे. कारण लवकरच मुंबईत मोठ्या संख्येने लोक समुद्रातून प्रवास करायला लागणार आहे.

मुंबईच्या गर्दीच्या रस्त्यांवरील वाहतुकीचा ओढा कमी करण्यासाठी 12 नवीन मार्गांवर वॉटर टॅक्सी सेवा सुरू केली जाणार आहे. त्याचबरोबर 4 नवीन मार्गांवर रोल ऑन रोल ऑफ सर्व्हिस सुरू केली जाईल. या शहरी जलवाहतूक प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी जलवाहतूक राज्यमंत्री मनसुख मंडवीया यांनी बुधवारी मुंबई बैठक घेतली. या महत्त्वपूर्ण बैठकीत मुंबई बंदराचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे अधिकाऱ्यांचा समावेश होता. 4 नवीन मार्गांवर रोपॅक्स फेरी सेवा आणि 12 नवीन मार्गांवर वॉटर टॅक्सी सेवा डिसेंबर 2021 पर्यंत सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

देशातील कोरोना रुग्णांचे प्रमाण मध्यंतरी उतरतील लागल्याचे पाहायला मिळाले होते

दैनंदिन प्रवाश्यांना खूप दिलासा मिळेल

रोपॅक्स फेरी सेवेचे 4 नवीन मार्ग आणि वॉटर टॅक्सी सेवेचे 12 मार्ग सुरू झाल्याने मुंबईतील दैनंदिन प्रवाश्यांना मोठा फायदा होणार आहे. यातून प्रवासी प्रदूषणमुक्त, शांततेत प्रवास करू शकतील. अंतर कमी असल्याने त्यांचा बराच वेळ वाचतो आणि खर्चही वाचतो. कार्बन फूटप्रिंटमध्येही लक्षणीय घट होईल. या सेवा सुरू झाल्याने मुंबई शहरातील प्रत्येक भागात मोठ्या संख्येने पर्यटक पोहोचू शकतील.

 1 तासात 110 किमी अंतर पूर्ण करणार

सध्या, भाऊचा ढाका ते मांडवा (अलिबाग) पर्यंत रॉपॅक्स सेवा उपलब्ध आहे. त्याअंतर्गत 110 कि.मी. रस्त्याला जलमार्गाद्वारे 18 कि.मी करण्यात आले आहे. दररोज प्रवास करणार्‍या लोकांना 3-4 तासांऐवजी 1 तासच प्रवास करावा लागणार आहे. या फेरी सेवेचा फायदा लक्षात घेता मुंबईतही इतर मार्गांवर अशा सेवा सुरू करण्याची योजना आहे.
"इतर सर्व किनारपट्टीवरील राज्यांत कामकाज सुरू झाल्यामुळे रोपेक्स सेवा आणि वॉटर टॅक्सी सेवेच्या इतर अनेक मार्गांनी एक सुलभ इको सिस्टीम तयार केली जाईल. नेटवर्क विकासासाठी नवीन शक्यता आणि नवीन संधी उघडतील," असे जलवाहतूक मंत्री म्हणाले.

संबंधित बातम्या