चीनपेक्षा मजबूत होण्याची गरज: सरसंघचालक
MOHAN BHAGAWAT

चीनपेक्षा मजबूत होण्याची गरज: सरसंघचालक

नागपूर-  भारतासह जगभरात कोरोना विषाणूचा संसर्ग चीनमधूनच झाला. भारताच्या सीमेतही कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय सैन्याने चीनला जोरदार प्रत्युत्तर दिले. भारताला आता सर्वच क्षेत्रांत चीनपेक्षा मजबूत होण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी सोहळा आज नागपुरात पार पडला. त्यावेळी ते  बोलत होते.

हिंदुत्वाबद्दल सरसंघचालक म्हणाले, "हिंदुत्व या शब्दाच्या अर्थाला पूजा-अर्चेशी जोडून संकुचित करण्यात आलं आहे. हा शब्द आपल्या देशाची ओळख आहे. हा शब्द आपल्या परंपरेचा भाग आहे. हिंदू कोणत्याही एका संप्रदायाचं नाव नाही. कोणत्याही एका प्रांतात जन्म झालेला हा शब्द नाही.
३७० कलम हटवण्यात आले. त्याचबरोबर न्यायालयाने राम मंदिराचा ऐतिहासिक निर्णय दिला. तो निर्णय संपूर्ण देशाने संयमाने स्वीकारला.  तसेच, देशात राहणाऱ्या लोकांमध्ये स्पर्धा असावी, युद्ध नसावे. समाजात कटुता निर्माण होऊ नये, असेही ते म्हणाले.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com