महाराष्ट्र सरकार जागा देईल त्या ठिकाणी गुंतवणूक करु: नितीन गडकरी

जगभरातील रस्त्यांचा अभ्यास करुन आधुनिक रस्ते गडकरींनी देशात तयार केले असे सांगत शरद पवारांचे (Sharad Pawar) नितीन गडकरींनी तोंडभरुन कौतुक केले.
महाराष्ट्र सरकार जागा देईल त्या ठिकाणी गुंतवणूक करु: नितीन गडकरी
Nitin Gadkari Dainik Gomantak

कोणत्याही देशांच्या विकासामध्ये रस्ते हे महत्त्वाचे असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या कामामुळे विकासाला अधिक गती मिळाली आहे. त्याचबरोबर नितीन गडकरींच्या काळामध्ये रस्त्यांचे जाळे दुपट्टीने वाढले, जगतील रस्त्यांचा स्टडी करुन गडकरींनी आपल्या देशात रस्ते तयार केले असल्याचे सांगत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नितीन गडकरींचे तोंडभरुन कौतुक करण्यात आले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते पहिल्यांदाच एका मंचावर दिसले.

Nitin Gadkari
'अटलबिहारी वाजपेयी आणि जवाहरलाल नेहरु आदर्श नेते: नितीन गडकरी

साखर कारखाने आणि सहकार क्षेत्राबद्दल बोलताना शरद पवार यांनी इथेनॉलची गरज मांडली. येत्या काळात इथेनॉल बनविण्याच्या क्षेत्रामध्ये पदार्पण करण्याची गरजही त्यांनी यावेळी बोलून दाखवली. यासाठी सरकारचे आर्थिक धोरण ठरविण्याची निकड आहे. इथेनॉलसोबतच हायड्रोजनपासून उर्जानिर्मिती करण्याचा प्रस्ताव असल्याची माहितीही त्यांनी दिली.

साखर उद्योग पश्चिम महाराष्ट्रात वाढलेला असला तरीही, साखरेला मर्यादा आहेत. मात्र इथेनॉलला नाहीत, असही पवार यांनी यावेळी म्हणाले. त्यामुळे येत्या काळामध्ये इथेनॉलच्या क्षेत्रामध्ये काम करावं लागणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Related Stories

No stories found.