रत्नागिरीत समुद्र किनाऱ्या‍वर व्हेल मासा आढळला मृतावस्थेत

गेल्या पाच वर्षात रत्नागिरी जिल्ह्यातील किनारी भागात अनेकदा मृतावस्थेतील व्हेल सापडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यात आता आणखीन एक घटनेची भर पडली आहे.
रत्नागिरीत समुद्र किनाऱ्या‍वर व्हेल मासा आढळला मृतावस्थेत
Whale fish dead in RatnagirDainik Gomantak

रत्नागिरीतील जाकिमिऱ्‍या गावातील पाटीलवाडी येथे काल सकाळी समुद्र किनाऱ्या‍वर व्हेल मासा मृतावस्थेत आढळून आला आहे. 25 फुटाहून अधिक लांबीचा हा महाकाय व्हेल होता. कुजलेल्या अवस्थेत किनाऱ्यावर लागलेल्या व्हेलचा मृत्यू काही दिवसांपूर्वी झाला असावा, असा अंदाज बांधण्यात येत आहे. (Whale fish dead in Ratnagiri)

गेल्या पाच वर्षात रत्नागिरी जिल्ह्यातील किनारी भागात अनेकदा मृतावस्थेतील व्हेल सापडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यात आता आणखीन एक घटनेची भर पडली आहे. पौर्णिमेच्या उधाणाबरोबर हा महाकाय व्हेल मध्यरात्रीच्या सुमारास किनारी भागाला लागला असल्याची माहिती मिळत आहे. सुरवातीला तो पाण्यात दिसून आला आणि तो लाटांबरोबर किनाऱ्याराव आला . ही माहिती मिळाल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या माशांची लांबी २५ फुट असून त्याचा मृत्यू समुद्रातच झाला होता आणि तो नंतर मृतावस्थेत किनाऱ्यावर आला असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाला असल्यामुळे तो सडलेल्या अवस्थेत होता त्यामुळे त्याची वैद्यकीय तपासणीही करणे अशक्य होते आणि म्हणून लगेचच त्यामुळे माशाची नियमानुसार विल्हेवाट लावण्याचा निर्णय वनविभागाने घेतला.

Whale fish  dead in Ratnagir
मासेमारी दरम्यान जाळ्यात अडकला डॉल्फिन!

व्हेल हा सागरी सस्तन प्राणी असून सर्वात मोठा मासा म्हणून ओळखला जातो. व्हेल माशाच्या उलटीची तस्करी देखील केली जाते आणि तीला कोटी रुपयांच्या घरात किंमत मिळते. गेल्या काही महिन्यांत कोकणात तीन ठिकाणी उलटीची तस्करी प्रकरणे उघडकिस आले होते.

जाकिमिऱ्या पाटीलवाडी येथील समुद्र किनारी मृतावस्थेतील व्हेल दिसून आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यानंतर घटनास्थळाची पाहणी केली असून तो मासा पूर्णतः सडलेल्या अवस्थेत आढळला. प्रचंड वास येत असल्यामुळे किनाऱ्यावरील वाळूतच त्याला पुरण्यात आले असल्याची माहिती वनाधिकारी प्रियंका लगड यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com