देवेंद्र फडणवीस यांचा 'पुतण्या' का आला चर्चेत? जाणून घ्या काय आहे प्रकरण

दैनिक गोमंतक
मंगळवार, 20 एप्रिल 2021

तन्मय फडणवीस यांनी कोरोना लस घेत असल्याचा फोटो शेअर केला आणि एका नव्या वादाला तोंड फुटले आहे.

पणजी: देशात निर्माण झालेल्या कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमध्ये आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाल्याचे पाहायला  मिळते आहे. अशातच देशात ऑक्सिजन, इंजेक्शन आणि कोरोना लसीचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा भासत असल्याचे दिसते आहे. देशातील फक्त 45 वर्षां नागरिकांनाच कोरोना लस दिली जात होती. मात्र त्यात देवेंद्र फडणीवस यांचे पुतणे तन्मय फडणवीस यांनी कोरोना लस घेत असल्याचा फोटो शेअर केला आणि एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. (Who is Tanmay Fadnavis and why did he come into the discussion)

महाराष्ट्रात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने मोठ्या प्रमाणात कोरोना लसीची आवश्यकता असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे. मात्र अशा  परिस्थितीमध्ये देखील लसीच्या पुरवठ्यावरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये राजकारण सुरु असल्याचे पाहायला  मिळते आहे. त्यातच राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या तन्मय फडणवीसचे नाव चर्चेत आले. तन्मय फडणवीस हे नाव चर्चेत येण्यामागचे कारण तन्मय फडणवीसने सोशल मीडियावर लस घेताना टाकलेला फोटो. देशात फक्त 45 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या लोकांना लस मिळत असताना 45 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या पुतण्याला लस कशी मिळते यावरून अनेक प्रश्न उपस्थित झाले. 

तन्मय फडणवीस (Tanmay Fadanvis) 45 वर्षांपेक्षा मोठा आहे का? तन्मय फडणवीस फ्रंटलाईन वर्कर आहे का? तो आरोग्य कर्मचारी आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित केल्या गेल्या नंतर  देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) अडचणीत आल्याचे पाहायला मिळाले. तर देवेंद्र फडणवीस  यांनी  या बद्दल बोलताना तन्मय हा आपला दूरच नातेवाईक असून त्याने लस कशी मिळवली हे आपल्याला माहिती नसल्याचे सांगितले आहे. 

"रेमडेसिविर खरेदी करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांची चौकशी झाली पाहिजे "

संबंधित बातम्या