अनिल देशमुखांच्या राजीनाम्यावर उद्धव ठाकरे शांत का? विरोधी पक्ष पुन्हा आक्रमक  

दैनिक गोमंतक
सोमवार, 5 एप्रिल 2021

नवी दिल्ली :  महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर राजीनामा दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंग यांच्या याचिकेवर दिलेल्या निर्णयानंतर देशमुख यांनी राजीनामा दिल्यामुळे  महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ मजली आहे.

नवी दिल्ली :  महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर राजीनामा दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंग यांच्या याचिकेवर दिलेल्या निर्णयानंतर देशमुख यांनी राजीनामा दिल्यामुळे  महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ मजली आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणावर आता महाराष्ट्रातील विरोधी पक्ष पुन्हा आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. भाजपाने सत्ताधारी ठाकरे सरकारवर निशाणा साधला असून थेट त्यांचा राजीनामा मागितला आहे.  भ्रष्टाचाराच्या आरोपावरून अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीचा आदेश मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राज्यात राज्य करण्याचा नैतिक अधिकार गामावल्याचा आरोप केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला आहे. 

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा अखेर राजीनामा 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या प्रकरणावर गप्प आहेत. शरद पवार म्हणतात की मुख्यमंत्री मंत्रीपदाचा निर्णय घेतात. कॉंग्रेस आणि शिवसेना म्हणते, अनिल देशमुख यांच्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस निर्णय घेईल. अनिल देशमुख यांनी शरद पवार यांच्यासही भेट घेतल्यानंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिला. सर्व घटना क्रमावर रविशंकर प्रसाद यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. ज्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात अशा मोठमोठ्या घटना घडत आहेत त्यांचा कोणताही नैतिक कर्तव्य नाही का, असा सवाल रवीशंकर प्रसाद यांनी विचारलं आहे. 

राफेल विमान घोटाळा : भारतीय दलालाला दिले होते 10 लाख युरो?

अनिल देशमुख यांनी आपल्या राजीनाम्यात नमूद केले की ते नैतिक कारणास्तव पदाचा राजीनामा देत आहेत, परंतु या संपूर्ण प्रकरणात उद्धव ठाकरे यांचे मौन अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत.  मुख्यमंत्री, तुमची काही नैतिकता आहे की नाही? तुमची नैतिकता कुठे आहे? आम्हाला तुमच्या नैतिकतेबद्दल ऐकायचे आहे. असे अनेक प्रश्न रविशंकर प्रसाद विचारले आहेत. त्याचबरोबर या सर्व घटनाक्रमानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता राज्य करण्याच्या नैतिक अधिकारापासून वंचित झाले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली आहे.  

योगी आदित्यनाथ यांचा अपशब्द वापरल्याचा व्हिडिओ होतोय व्हायरल; जाणून घ्या नेमकं...

तर दुसरीकडे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे,  महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांनी वाचविण्याचे  प्रयत्न केले. मात्र शरद पवार यांनी अनिल देशमुख यांच्यावर आरोप झाले तेव्हाच त्यांनी राजीनामा द्यायला हवा होता. अखेर उच्च न्यायालयाने  हस्तक्षेप केल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला. मात्र या सर्व घटनाक्रमावर उद्धव ठाकरे शांत का आहेत, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. 

संबंधित बातम्या