सिंधुदुर्गात आज लोकार्पण झालेल्या विमानतळाचे नाव 'चिपी' का?

2021 मध्ये DGCA च्या पथकाने धावपट्टी (Runway) बाबत आक्षेप घेतला. आणि याला आणखीच विलंब झाला. त्यानंतर याची दुरुस्ती करण्यात आली.
सिंधुदुर्गात आज लोकार्पण झालेल्या विमानतळाचे नाव 'चिपी' का?
Chipi Airport Dainik Gomantak

Chipi Airport: सिंधुदुर्गात तब्ब्ल 20 वर्षांच्या मोठ्या प्रतीक्षेनंतर चिपी परूळे (Chipi Parule) विमानतळ (Airport) प्रवाशांसाठी सज्ज झाले. विशेष म्हणजे कोंकणवासीयांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे. या विमानतळासाठी कोणत्याही व्यक्तींच्या नावाचा आग्रह धरला नाही. परंतु चिपी विमानतळ (Chipi Airport) असेच का संबोधले असा प्रश्न नक्कीच पडला असेल?

काय आहे या नावामागचा इतिहास:

या विमानतळाला 'चिपी परूळे' असे संबोधण्यात आले आहे. कारण की हे विमानतळ परूळे येथील 'चिपी वाडी' या ठिकाणी उभारले आहे. चिपी गाव हा परुळेचाच भाग असून यापूर्वी ते एक पठार होते. पठारावर हे विमानतळ उभारण्यात आले आहे. विशेष बाबा म्हणजे येथे आंतरराष्ट्रीय विमानही (International flights) उतरणार आहेत.

राजकारणाच्या पलीकडे पाहिल्यास हे विमानतळ कोकणच्या विकासाला गती देणारे ठरू शकणार आहे. येथे पर्यटनासह (tourism) आंबा, (Mango) ,काजू (cashews)आणि मत्स्योत्पादनाला (Fish) थेट जागतिक बाजारपेठेमध्ये जोडण्याचा प्रयत्न यामुळे केला जाणार आहे.

Chipi Airport
नाव न घेता राणेंची सेनेच्या नेत्यांवर कोकणी तोफ

कोणी केलं बांधकाम?

'बांधा वापरा आणि हस्तांतरित करा' (95 वर्षे) या तत्त्वावर या विमानतळाच्या उभारणीसाठी MIDC ने 2009 साली टेंडर काढले. I.R.B. सिंधुदुर्ग एअरपोर्ट कंपनीने ते घेतले. त्यानंतर 2012 साली पर्यावरण विभागाकडून हिरवा कंदील देण्यात आला. यानंतर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धर्तीवर चिपी या विमानतळाचे काम केले. परंतु कोरोनामुळे याचे उद्घाटन रखडले गेले होते. त्यातच मार्च 2021 मध्ये DGCA च्या पथकाने धावपट्टी बाबत आक्षेप घेतला. आणि याला आणखीच विलंब झाला. याची दुरुस्ती करण्यात आली आणि आता हे विमानतळ प्रवाशांसाठी सज्ज झाले आहे.

Chipi Airport
खोटं बोलणाऱ्यांना बाळासाहेबांनी सेनेतून काढून टाकलं; 'ठाकरी तोफ' धडाडली

कसे आहे याचे आकारमान:

  • याची एकूण व्याप्ती 275 हेक्टर आहे.

  • धावपट्टीची लांबी 2500 मीटर आणि रुंदी 60 मीटर आहे.

  • येथे एअरबस A-320 आणि बोईंग 777 अश्या विमानांना येत येईल.

  • याची टर्मिनल बिल्डिंग ही 10 हजार चौरस फुट आहे.

  • प्रवाशांसाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकावेळी 200 आगमन आणि 200 प्रवाशांचे निर्गमन होण्याची क्षमता आहे.

  • एक वेळी 3 विमानांना पार्क करता येऊ शकते. आणि पुढच्या टप्प्यात पार्किंग हे 15 पर्यंत वाढवण्यात येणार आहे.

  • विमानांमध्ये इंधन भरणे आणि नाईट लँडिंग करण्याची व्यवस्था ही आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com