एकनाथ खडसे 'ईडी'च्या चौकशीला सहकार्य करणार

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 27 डिसेंबर 2020

यापूर्वी आपली चार वेळा विविध संस्थांतर्फे चौकशी झाली आहे. याही खेपेस आपण चौकशीत तपास संस्थेला संपूर्ण सहकार्य करणार आहोत, अशी माहिती राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.

जळगाव :   होय, सक्तवसुली संचालनालयाची (ईडी) नोटीस आपल्याला मिळाली आहे. भोसरी येथील जमीन खरेदी प्रकरणी ही चौकशी आहे. यापूर्वी आपली चार वेळा विविध संस्थांतर्फे चौकशी झाली आहे. याही खेपेस आपण चौकशीत तपास संस्थेला संपूर्ण सहकार्य करणार आहोत, अशी माहिती राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.खडसे म्हणाले, ‘‘ भोसरी येथील जमीन खरेदी प्रकरणी ही चौकशी होणार आहे. बुधवारी (ता.३०) आपल्याला मुंबई येथील ‘ईडी’च्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास  कळविण्यात आले आहे. त्यानुसार या चौकशीसाठीआपण संपूर्ण सहकार्य करणार असून कागदपत्रांसह आपण किंवा आपला प्रतिनिधी या चौकशीला सामोरे जाईल.’’ या जमीन खरेदीशी आपला संबंध नाही, पत्नीच्या नावे ही जमीन खरेदी करण्यात आली आहे. या जमिनीच्या खरेदीची सर्व माहिती आपण या चौकशीत देणार आहोत, असे त्यांनी नमूद केले

 

‘दारू पिऊन आरोप’ 

जळगाव जिल्ह्यातील प्रफुल्ल लोढा यांनी परवा पत्रकार परिषद घेतली होती. त्यांनी एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली होती. याबाबत खडसे यांना विचारले असता, लोढा यांचे नाव न घेता ते म्हणाले, ‘‘ दारू पिऊन पत्रकार परिषद घेणाऱ्या माणसाची दखल माध्यमे घेत आहे, त्याबद्दल मला आश्‍चर्य वाटत आहे. मला या माणसाची दखलही घ्यावीशी वाटत नाही.’’

संबंधित बातम्या